शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 29 जून 2022 (21:00 IST)

सरकार पडत असताना छत्रपती संभाजीराजेंचे ट्विट; म्हणाले, शासनाला विसर पडू देऊ नका

sambhaji raje
गेल्या चार पाच दिवसांत राज्य शासनाने तब्बल दीडशेहून अधिक शासन निर्णय काढले आहेत. तसेच काही वेळातच मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीराजे  यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह राज्य सरकारला मराठा समाजाला दिलेल्या आश्वासनांची आठवण करून दिली आहे. त्य़ांनी ट्विट करत कायमस्वरूपी नियुक्तीची मागणीही केली आहे.
काय म्हणाले संभाजीराजे
गेल्या काही दिवसांत शासनाने अनेक GR काढले आहेत. मात्र मराठा आरक्षण व आझाद मैदानावरील उपोषणावेळी समाजाला दिलेली आश्वासने शासनाने विसरू नयेत. शासकीय नोकरीत निवड होऊनही नियुक्ती न मिळालेल्या मराठा उमेदवारांच्या कायमस्वरूपी नियुक्तीचा GR देखील काढावा अशी मागणी संभाजीराजे यांनी केली आहे.