गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 25 फेब्रुवारी 2019 (17:06 IST)

मुंबईत बॉम्ब ची अफवा नागरिकांचा जीव टांगणीला

ठाणे आणि रायगड येथे बॉम्ब सापडल्याने सुरक्षा यंत्रणा जागरूक आहेत, त्यातच मुंबईतील बोरीवली पश्चिम येथे गोराई डम्पिंग ग्राऊंडमध्ये आज कचऱ्यात बॉम्ब सदृश वस्तू आढळली होती. त्यामुळे बोरिवली परिसरात चांगलीच खळबळ निर्माण झाली होती. बॉम्ब शोधक, नाशक पथक (बीडीडीएस) घटनास्थळी दाखल झाले मात्र, पथकाने तपासणी केली असता बॉम्बच्या आकाराचं लहान मुलांचं खेळणं असल्याचं उघड झाले. त्यामुळे भयभीत बोरिवलीकरांना सुटकेचा निश्वास सोडला आहे. गोराईतील कृष्णा मेनन अकादमी ज्युनियर कॉलेजची बस गोराईवरुन मुलांना घेण्यासाठी निघाली होती. 
 
त्यावेळी बसमधील महिला तृप्ती गोरक्ष यांच्या नजरेस काहीतरी संशयास्पद वस्तू दिसून आली होती, त्यानंतर त्यांनी लगेचच शाळा व्यवस्थापकांना फोन केला आणि ही गंभीर बाब याबाबतची माहिती दिली. शाळेने पोलीस नियंत्रण कक्षास ही माहिती कळवली आणि घटनास्थळी बीडीडीएस पथक दाखल झाल होते. मात्र तपासणी केली आणि खेळणी निघाली मात्र कोणतीही अनुचित घटना घडली नाही आणि सर्वांनी सुटकेचा निश्वाश टाकला आहे.