शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 30 ऑक्टोबर 2021 (12:20 IST)

Diwali Special Trains : मुंबई पुण्यातून प्रवाशांसाठी धावणार दिवाळी विशेष ट्रेन

सणा सुदीचं लोक प्रवास करतात. त्यांना आरक्षण मिळत नाही. कोरोना नंतर ही दिवाळी सगळ्यांसाठी खास आहे. त्यामुळे यंदाच्या दिवाळीत नागरिक प्रवासासाठी बाहेर पडत आहे. प्रवाशांना गैरसोय होऊ नये तसेच प्रवाशांच्या वाढत्या संख्येला बघता मध्य रेल्वे कडून प्रवाशांसाठी दिवाळी आणि छठ पूजेसाठी स्पेशल ट्रेन चालविण्याचा निर्णय घेतला आहे. ही विशेष रेल्वे लोकमान्य टिळक टर्मिनस -बरौनी आणि पुणे पटना दरम्यान सुरु होणार आहे. या ट्रेन मध्ये ज्या प्रवाशांचे तिकीट कन्फर्म आहे त्यांनाच बसायला जागा दिली जाणार. 

ही स्पेशल ट्रेन 05298 लोकमान्य टिळक टर्मिनल वरून 15 नोव्हेंबर रोजी 12:15 ला सुटेल आणि तिसऱ्या दिवशी सकाळी 5 वाजता बरौनी पोहोचेल. 
तर बरौनीवरून 05297 ही विशेष ट्रेन 13 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 4:30 ला सुटेल आणि तिसऱ्या दिवशी 10 वाजता लोकमान्य टर्मिनल्स पोहोचेल.
ही ट्रेन कल्याण, इगतपुरी, नाशिकरोड, भुसावळ, खंडवा, इटारसी, पिपरिया, नरसिंहपूर, जबलपूर, कटनी, मैहर, सतना, मानिकपूर, प्रयागराज छिवकी जंक्शन, वारणसी, छपरा, हाजीपूर, मुझफ्फरपूर आणि समस्तीपूर रेल्वे स्थानकावर थांबा घेणार.या रेल्वेमध्ये 2 एसी - 2 टिअर, 10 एसी 3 टिअर आणि 9 सेकंड सिटिंग बोगी असेल.
 
पुणे ते पटना विशेष गाडी 03382 14 नोव्हेंबर रोजी पुण्यावरून सकाळी 5:30 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी 12 वाजता पटना पोहोचेल. 03381 ही गाडी पटनावरून सकाळी सुटून दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 6 :50 वाजता पोहोचेल. ही ट्रेन दौंड, अहमदनगर,  बेलापूर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, खंडवा, इटारसी , पिपरिया, गाडरवारा, नरसिंहपूर, जबलपूर, कटनी, मैहर, सतना, मानिकपूर, प्रयागराज छिवकी जं, पं. दीन दयाल उपाध्याय जं, बक्सर आणि आरा या रेल्वे स्थानकावर थांबा घेईल. या विशेष ट्रेनमध्ये 6 एसी 3 टियर, 6 स्लीपर क्लास आणि 9 सेकंड सीटिंगचे कोच असतील. 
या विशेष ट्रेन साठी आज पासून 30 ऑक्टोबरपासून बुकिंग सुरु होणार आहे.