शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 2 मार्च 2021 (21:37 IST)

नाशिकमध्ये बॉम्ब सदृश्य वस्तू आढळल्याने खळबळ

शहरातील गंगापूर रोड आणि कॉलेज रोड या दोन मुख्य रस्त्यांना जोडणाऱ्या लिंक रोडवर मंगळवारी दुपारी बॉम्ब सदृश्य वस्तू आढळली. सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि बॉम्ब नाशक पथकांनी घटनास्थळी धाव घेतली. बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाकडून या बॉम्ब सदृश्य वस्तूला नष्ट करताना यामध्ये एक प्लॉस्टिकच्या एका लहान बॉलमध्ये फटाक्याची दारु आणि त्यामध्ये वात भरलेली होती. त्यामुळे हा गावठी बॉम्ब असल्याचे निष्पण्ण झाले. हा गावठी बॉम्ब शोध पथकाच्या साहेबराव नवले यांनी निकामी केला आहे. 
 
या बॉम्बमध्ये कोणत्याही प्रकारचा धातू किंवा घातक स्फोटक मिश्रित घटक नसल्याचे बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाने स्पष्ट केले. त्यामुळे या स्फोटकाची तीव्रता एका फटाक्यापेक्षा जास्त नसल्याचे समोर आले  आहे. सदरची वस्तू कोणाच्या हातात फुटली असती तर त्या व्यक्तीच्या हाताला इजा झाली असती. बाकी काही गंभीर परिणाम झाले नसते अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. हे स्फोटक याठिकाणी कोणी ठेवले किंवा हे स्फोटक ठेवण्यामागे कोणाचा हात आहे याचा शोध पोलीस घेत आहे.