गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 14 ऑक्टोबर 2020 (08:39 IST)

नात्याला काळीमा, रागात नातवाने आजोबांचीच केली हत्या

नाशिकमध्ये आपल्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार केल्याचा रागात नातवाने आजोबांचीच हत्या केली आहे. रघुनाथ श्रावण बेंडकुळे यांचा खून नातवाने केल्याचे उघड झाले आहे. संशयित नातू किरण निवृत्ती बेंडकुळे यास पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
 
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे घराबाहेर जाण्यास नातवाने विरोध केला होता. तसेच शारिरीक व मानसिक त्रास देत असल्याची पोलिसांकडे तक्रार केली होती. तक्रार केली म्हणून नातवाने आजोबांच्या तोंडाला चिकटपट्टी तसच हातपाय बांधून नाल्यात फेकल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. आडगाव पोलीस तपासात पोलिसांनी घेतली मारुती कार ताब्यात घेतली आहे. 
 
नातवाच्या त्रासाला कंटाळून आजोबांनी एक महिन्यापूर्वी हरसूल पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याचा राग अनावर झाल्याने किरणने रविवारी (दि.११) रात्री घराबाहेर झोपलेल्या आजोबांच्या डोळे, नाक, तोंड, हाताला चिकपट्टी लावली व लोखंडी साखळीने बांधून मृतदेह मारुती ओमनीने धोंडेगाव येथून ओढा शिवारात नाशिक-औरंगाबाद महामार्गावर वैष्णवी ढाब्याच्या समोरील नाल्यात टाकला.