शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 13 नोव्हेंबर 2021 (16:37 IST)

उद्यापासून 4 दिवस पुण्यात पावसाची धुवाधार बॅटींग

पुढील पाच दिवस राज्यात अनेक ठिकाणी पावसाची (Rain in maharashtra) शक्यता हवामान खात्याकडून (IMD) वर्तवण्यात आली आहे. गेली काही दिवस पुण्यात पावसानं उघडीप घेतल्यानंतर, उद्यापासून पुन्हा एकदा पुण्यात जोरदार पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने उद्यापासून पुढील चार दिवस पुण्यात येलो अलर्ट जारी केला आहे. दरम्यानच्या चार दिवसांत पुण्यासह दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि घाट परिसरात अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. पुण्यात चारही दिवस विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
 
आज सकाळपासूनचं दक्षिण मध्य महाराष्ट्र, दक्षिण कोकण, घाट परिसर आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ हवामानाची नोंद करण्यात आली आहे. याशिवाय गोवा, कर्नाटक, केरळ, आणि आंध्र प्रदेशातील अनेक जिल्ह्यांवर देखील तीव्र पावसाचे ढग दाटले आहेत.