बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 7 फेब्रुवारी 2022 (21:34 IST)

जयंत पाटील यांची काँग्रेसवर मिश्किल टिप्पणी

सांगलीतील एका कार्यक्रमात बोलताना जयंत पाटील यांनी महाविकास आघाडीतील  घटकपक्ष असलेल्या काँग्रेसवर मिश्किल टिप्पणी केलीय. राष्ट्रवादी काँग्रेसचं चिन्ह घड्याळ आहे. मात्र, शिवसेना आणि हाताच्या नादी लागल्यापासून घडाळ्याची वेळ चुकत आहे, असं जयंत पाटील म्हणाले. त्याचं झालं असं की या कार्यक्रमाला काँग्रेसचे नेते आणि राज्यमंत्री विश्वजित कदम  काहीसे उशिरा पोहोचले, त्यामुळे कार्यक्रमालाही काहीसा उशीर झाला. त्यावरुन जयंत पाटील यांनी वरील टिप्पणी केलीय.
 
स्वर्गीय गुलाबराव पाटील प्रतिष्ठान आणि सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वतीनं सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते पुरस्कार वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. जयंत पाटील यांनाही या कार्यक्रमाला पोहोचण्यासाठई काहीसा उशीर झाला. त्यामुळे भाषणाला उभं राहिल्यानंतर त्यांनी उपस्थित लोकांची माफी मागितली. राज्यमंत्री विश्वजित कदम याची वाट पाहत बसावं लागलं आणि कार्यक्रम सुरु होण्यास वेळ लागला, असं जयंत पाटील म्हणाले. तसंच शिवसेना आणि हाताच्या नादी लागल्यापासून घडाळ्याची वेळ चुकत आहे, असं मिश्किल वक्तव्यही त्यांनी केलं. हे वक्तव्य केल्यानंतर उपस्थित माध्यम प्रतिनिधींना हे लगेच छापू नका, असंही पाटील म्हणाले.