बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 10 नोव्हेंबर 2021 (08:45 IST)

संजय राऊत आणि शरद पवार यांची भेट

महाविकास आघाडी आणि विरोधी पक्ष भाजपमध्ये आरोप- प्रत्यारोपाचे सत्र सुरू असताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. ही भेट खासगी स्वरूपाची असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनीही शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीच्या वेळी मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे उपस्थित होते.
 
शरद पवार आणि दिलीप वळसे पाटील यांच्या भेटीत नक्की काय चर्चा झाली याचा तपशील पुढे आलेला नाही. मात्र सध्या सुरू असलेले ड्रग्ज प्रकरण, एनसीबीची कारवाई या विषयावर शरद पवार यांनी माहिती घेतली असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान संजय राऊत आणि शरद पवार यांची भेट खासगी स्वरूपाची होती. मुलीच्या लग्नाचे निमंत्रण देण्यासाठी राऊत गेले असल्याचे समजते.