शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 10 डिसेंबर 2021 (21:28 IST)

झाडांवर खिळे ठोकणा-यावर गुन्हे दाखल होणार

नागपूर शहराचे सौंदर्यीकरण आणि पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने नागपुरात मोठ्या प्रमाणात रस्त्याच्या कडेला  झाडांची लागवड करण्यात आली. आहे.मात्र शहरातील अनेक भागांमध्ये रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडांवर जाहिरातदार खिळे  ठोकून जाहिराती पत्रके लावलेली दिसतात. खिळे ठोकल्याने झाडांना इजा व नुकसान  करण्यात आल्याचं दिसून येतं. याबाबत पर्यावरण प्रेमींनी अनेक तक्रारी केल्या आहे. धक्कादायक म्हणजे गेल्या पाच वर्षात ५ हजार २७४ झाडं कापण्यात आल्याच वास्तव पण समोर आलं आहे.  मनपा प्रशासनानं आता पर्यावरणाच्या दृष्टीनं कठोर पाऊल उचलणे सुरु केले आहे. त्यादृष्टीनं झाडांवर खिळे ठोकणा-यावर गुन्हे दाखल करण्यात येणार आहे.
पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने आपली जबाबदारी ओळखून तीन दिवसात आपल्या जाहिराती काढण्याबाबत आवाहन मनपा आयुक्त राधाकृष्णन बी यांनी केले आहे .यानंतर हे खिळे ठोकून जाहिराती आढळल्यास संबंधित जाहिरातदारा विरोधात मनपातर्फे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात येणार आहे