गुरूवार, 10 ऑक्टोबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 1 ऑगस्ट 2022 (08:13 IST)

वाढती महागाई आणि मोदी सरकारच्या जनतेविरोधी धोरणांसाठी अमरावतीत राष्ट्रवादीचे जनआंदोलन

Protest
केंद्र सरकारच्या शेतकरी, कष्टकरी व सामान्य जनता विरोधी धोरणामुळे अख्खा देश महागाईच्या आगीत होरपळून निघत आहे. या विरोधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा अमरावती विभागीय समन्वयक संजय खोडके यांच्या पुढाकाराने आज अमरावती शहरातील राजकमल चौकात निदर्शने व धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी संजय खोडके यांनी केंद्रातील मोदी सरकार व राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर सडेतोड टीका केली. अशा असंवेदनशील सरकारला वठणीवर आणण्यासाठी आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने आंदोलनाचा बिगुल फुंकला असून जनआंदोलन छेडणार असल्याचा इशारा त्यांनी या आंदोलनाच्या माध्यमातून दिला. पुढे अनेक जिल्हा पदाधिकाऱ्यांनीही आपले विचार यावेळी मांडून केंद्र आणि राज्य सरकारला धारेवर धरले. लोकशाही मार्गाने आंदोलन सुरू असताना पोलिसांनी आंदोलन उधळून लावले व शेकडो आंदोलनकर्त्यांना डिटेन केले. यावरूनही आंदोलकांकडून सरकारच्या दडपशाही धोरणाचा निषेध करण्यात आला.
 
यावेळी शहराध्यक्ष प्रशांत डवरे, माजी महापौर ॲड. किशोर शेळके, मनपा स्थायी समितीचे माजी सभापती अविनाश मार्डीकर, माजी नगरसेवक रतन डेंडूले, लकी नंदा, भूषण बनसोड, प्रवीण मेश्राम, प्रशांत महल्ले, जयश्री मोरे, सपना ठाकूर, मंजुश्री महल्ले, विजय बाभुळकर, ममता आवारे, के. एम. अहमद, अब्दुल सत्तार राराणी, युवक जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ. सुशील गावंडे, युवक शहराध्यक्ष ऋतुराज राऊत, विद्यार्थी शहराध्यक्ष आकाश हिवसे, डॉ. गणेश खारकर, प्रा. डॉ. हेमंत देशमुख तसेच शेकडोच्या संख्येने जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.