मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 26 एप्रिल 2023 (08:42 IST)

पनवेल :सोशल मीडियावर मैत्री करून एका शिक्षकेवर लैंगिक अत्याचार

rape
पनवेल (रायगड) परिसरातील एका शिक्षकेबरोबर सोशल मीडियाचा वापर करून प्रथम मैत्री त्यानंतर लग्नाचे आमिष आणि नंतर शारीरिक संबंध ठेवून तिच्याशी लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली असून याप्रकरणी आरोपी विरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात पीडित महिलेने तक्रार केली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
 
या प्रकरणातील आरोपीचे नाव कृष्णा मेंगळ (३१) रा. अहमदनगर याने एक वर्षांपूर्वी पीडित महिलेशी सोशल मीडिया वरून ओळख करून घेतली, त्यानंतर तिच्याशी मैत्री करून प्रेम संबंध निर्माण केले. मेंगळ याने तिला लग्नाची आम्हीच दाखवून अनेक वेळा शारीरिक लैंगिक अत्याचार केले. त्याचबरोबर पीडित महिलेची गोड बोलून वेगवेगळे कारण दाखवून ११ लाख ८० हजार रुपये घेतले. काही दिवसांनी त्याने पीडित महिलेबरोबर संबंध कमी करत लग्नाला नकार दिला. मेंगळ याच्या वागण्यामध्ये बदल झाल्याची लक्षात आल्यानंतर पीडित महिलेने रक्कम परत मागितली. परंतु त्याने रक्कम देण्यास टाळाटाळ केली आणि आपल्या मूळ गावी पळून गेला. कृष्णा मेंगळ याने आपली फसवणूक केल्याचे आढळून आल्यानंतर पीडित महिलेने पनवेल शहर पोलीस ठाण्यामध्ये मेंगाळ यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.

Edited By- Ratnadeep Ranshoor