गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 6 जानेवारी 2020 (10:32 IST)

रावसाहेब दानवे यांचा शिवसेनेला टोला, 'आता वाघाची शेळी झाली'

राज्यामध्ये शिवसेनेचे सरकार फार काळ टिकणार नाही. असे सांगत आता या वाघाची शेळी झाली आहे अशा शब्दांमध्ये केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. लातूर जिल्हा परिषद भाजपच्या ताब्यात राहिल. सरकार बदलण्याचा जिल्ह्याच्या सत्ताकारणावर परिणाम होणार नाही असे मत दानवे यांनी व्यक्त केले.
 
तसेच नागपूर येथे जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निडणुकीसाठी झालेल्या प्रचारात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. राज्यात तयार झालेलं सरकार विश्वासघात आणि बेईमानीचं सरकार आहे.
 
शिवसेना स्वार्थासाठी कुठेही जाऊ शकते. कुठेही स्थायिक होऊ शकते. काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जाऊन शिवसेनेने बेईमानी वृत्ती दाखवली आहे. बेईमानानी आणि विश्वासघातानं बनलेलं सरकार सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ टिकणार नाही असं फडणवीस यांनी सांगितलं.