रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 20 नोव्हेंबर 2021 (13:01 IST)

धक्कादायक ! वाघाच्या हल्ल्यात महिला वनरक्षकाचा मृत्यू

चंद्रपूर ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्पात कोलारा वन परिक्षेत्रात एका वाघिणीने  इथे महिला वनरक्षकावर हल्ला केला. या हल्ल्यात या महिला वनरक्षकाचा दुर्देवी मृत्यू झाला असून वन विभागात खळबळ उडाली आहे.  स्वाती ढुमणे(43) असे या मयत झालेल्या महिला वनरक्षकाचे नाव आहे. आज सकाळी सुमारे आठ वाजता ही घटना घडली आहे. सकाळी महिला वनरक्षक स्वाती या ४ मजुरांसह कोलारा  झोन मध्ये वॉटर होल जवळ पाणी बघायला गेल्या असताना पाणवठ्या जवळ दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक त्यांच्यावर हल्ला केला आणि स्वातीला ओढून जंगलात नेले. मजुरांनी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला तो पर्यंत स्वाती यांचा मृत्यू झाला होता. 
घटनेची माहिती मिळतातच वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले .त्यांनी शोधमोहीम सुरु केली असता स्वातीचा मृतदेह जंगलात आढळला.