मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 20 नोव्हेंबर 2020 (10:21 IST)

दहावी, बारावीच्या फेरपरीक्षा आजपासून सुरु

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विलंबाने होत असलेल्या दहावी, बारावीच्या फेरपरीक्षा आजपासून सुरु होत आहे. दहावीची परीक्षा ५ डिसेंबरपर्यंत तर बारावीची परीक्षा १० डिसेंबरपर्यंत चालणार आहे. दहावीसाठी १३ हजार तर बारावीसाठी २२ हजार विद्यार्थ्यांनी नोंद केली आहे.
 
महाराष्ट्र राज्य व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, पुणे, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण विभागीय मंडळातर्फे दहावी आणि बारावीची फेरपरीक्षा २० नोव्हेंबरपासून घेण्यात येणार आहेत. फेब्रुवारी-मार्च २०२० च्या परीक्षेत उत्तीर्ण न झालेले व एटीकेटीसाठी पात्र विद्यार्थ्यांना ही परीक्षा देता येणार आहे. मुंबईतून या परीक्षेसाठी दहावीसाठी १३ हजार तर बारावीसाठी २२ हजार विद्यार्थ्यांनी नोंद केली आहे. परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांना विद्यार्थी व पालकांना येणार्‍या अडचणी सोडवण्यासाठी मुंबई विभागातर्फे विशेष हेल्पलाईन क्रमांक सुरू करण्यात आला आहे. परीक्षांच्या काळात जे विद्यार्थी नकारात्मक विचाराने किंवा परीक्षेच्या भितीने मानसिक तणाव व दडपणाखाली असतात. अशा विद्यार्थ्यांना नैराशातून बाहेर काढण्यासाठी तसेच विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन करण्यासाठी समुपदेशकांनी नियुक्ती मुंबई विभागीय मंडळातर्फे करण्यात आली आहे.