मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 13 ऑगस्ट 2022 (08:11 IST)

गोळी शाळेतून घराकडे चाललेल्या विद्यार्थिनीच्या पायाच्या पोटरीत शिरली

अमरावती : नेम चुकल्याने कट्ट्यातून निघालेली ती गोळी शाळेतून घराकडे चाललेल्या विद्यार्थिनीच्या पायाच्या पोटरीत शिरली. यात ती १३ वर्षीय मुुलगी गंभीर जखमी झाली. तिला खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
 
पोलीस सूत्रांनुसार,दरम्यान, अहमद हा आपल्या सहकाऱ्यांसमवेत सायंकाळी पाचच्या सुमारास तलवारी घेऊन जुबेरच्या दुकानात पोहोचला. अहमद व त्याच्या साथीदाराने जुबेरवर हल्ला चढविला. प्रचंड हलकल्लोळ उडाला. त्यातच जुबेरने स्वत:कडील देशी कट्टा अहमदवर रोखला. त्यामुळे अहमद दुकानाकडून मुख्य रस्त्याच्या दिशेने पळाला. जुबेरने त्याच्या दिशेने तीन फायर केले. पठाण चौक ते भातकुली मार्गावरील बाबा चौकालगतच्या चारा चौकात ही थरारक घटना १२ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ च्या सुमारास घडली. फायर करणारा आरोपीदेखील गंभीर जखमी झाला आहे. घटनेवेळी तीन फायर करण्यात आले. पैकी घटनास्थळाहून दोन रिकामे कारतूस जप्त करण्यात आले. सदफ परवीन नौशाद कुरेशी (१३, हैदरपुरा) असे जखमी मुलीचे नाव आहे. आरोपी अहमद चना व चिकन व्यावसायिक जुबेरखाँ यांच्यात शुक्रवारी दुपारी २.३० च्या सुमारास चारखंबा परिसरात पैशांच्या वादातून बाचाबाची झाली. त्यावर सायंकाळी तुझ्या दुकानात येतो, पाहून घेतो, असे सांगून अहमद तेथून निघून गेला. दुसरीकडे जुबेरने आपल्या परफेक्ट चिकन सेंटरमध्ये तीन तलवारी व देशी कट्टा आणून ठेवला.