मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 27 जानेवारी 2020 (15:24 IST)

घटनाबह्य कृती घडल्यास काँग्रेस पक्ष सत्तेतून बाहेर पडेल

सरकारकडून कोणतीही घटनाबह्य कृती घडल्यास काँग्रेस पक्ष सत्तेतून बाहेर पडेल, असे वक्तव्य काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी केले. ते नांदेडमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी महाविकासआघाडी सरकारच्या स्थापनेवेळी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांमध्ये झालेल्या करारमदारांचा खुलासा केला.
 
यावेळी अशोक चव्हाण यांनी म्हटले की, महाराष्ट्रात तीन पक्षाचे व तीन विचारांचे सरकार चालणार कसे?, असा सवाल करीत काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी तीन पक्षाच्या सरकारला (महाविकास आघाडी) विरोध केला होता, परंतु, आम्ही सोनिया गांधी यांना राजी केले. परंतु, त्यावेळी आम्ही घटनाबाह्य काम करणार नाही, असे शिवसेनेकडून लिहून घेतले. सेनेने जर उद्देशिकबाहेर काम केले तर आम्ही सरकारमधून बाहेर पडू, असे अशोक चव्हाण यांनी सांगितले.