बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 7 ऑगस्ट 2021 (15:58 IST)

भाजप आणि मनसे युतीचा निर्णय हा अमित भाईंचा असेल : चंद्रकांत पाटील

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे देशात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडींचा आढावा घेत असतात. त्यामुळेच महाराष्ट्राच्या राजकारणीत अपडेट्स त्यांच्याकडे येणार नाही अशी गोष्ट घडत नाही.अमित शहा हे प्रत्येक राजकीय घडामोडीच्या बाबतीत नेहमीच अपडेट असतात. म्हणूनच माझी आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट झाली, ही भेट खूपच एक्सिडेंटल होती ही माहिती मी त्यांची जर वेळ मिळाली तर नक्कीच सांगणार आहे, अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी एका वृत्तवाहिनीला दिली.

भाजप आणि मनसे युतीचा निर्णय हा अमित भाईंचा असेल असेही चंद्रकांत पाटील म्हणाले. तसेच महाराष्ट्राच्या राजकारणावर या युतीचे नेमके काय परिणाम असतील हेदेखील महत्वाचे आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.संसदेचे अधिवेशनात अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे शेड्युल्ड आता व्यस्त आहे.सध्या संसदेच्या कामकाजामुळे ते भेटीसाठी किती वेळ देऊ शकतील याबाबत शंका आहे, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.