रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मुंबई , शुक्रवार, 1 डिसेंबर 2023 (08:07 IST)

‘कोका कोला’ची फॅक्टरी कोकणात उभी राहणार

eknath shinde
आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रसिद्ध बेव्हरेज कंपनी ‘कोका कोला’ महाराष्ट्रातील पहिली फॅक्टरी कोकणात उभी राहणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या फॅक्टरीचे उद्घाटन गुरुवारी पार पडले. यावेळी हा आनंदाचा क्षण असल्याचं त्यांनी म्हटले आहे. या प्रकल्पातील सर्व अडचणी दूर झाल्या असून चांगली सुरुवात कोकणच्या भूमीत होत असल्याचं मुख्यमंर्त्यांनी म्हटले आहे.
 
मुख्यमंत्री म्हणाले, या प्रकल्पातील अडचणी दूर करण्याचे काम आपण केले आहे. चांगली सुरुवात कोकणात सुरु होत आहे. एका बाजुला आरोग्याच्या अत्याधुनिक सुविधा देण्याचा प्रयत्न आपण करतो आहोत. त्याचबरोबर आर्थिक प्रगतीच्या दृष्टीने उद्योग भरभराट रोजगार हे देखील आवश्यक आहे. त्यामुळे उद्योगाची पावले या भूमीत पडली पाहिजेत ही भूमिका राज्य शासनाची आहे.
 
थंडा मतलब आता फक्त कोका कोला नव्हे तर थंडा मतलब प्रोग्रेस असंही यावेळी मुख्यमंत्री म्हणाले. पर्यायवरणाचे रक्षण करतानाच औद्योगिकीरणही महत्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. कोकणातील आंबा-काजूच्या विकासाचं संवर्धन आपण करतोच आहोत परंतू अत्याधुनिक जगाची गरज ओळखून आपण औद्योगिकतेची कास देखील धरली पाहिजे.
हिंदुस्तान कोको कोला ब्रेव्हरेज कंपनीने सुरुवातीला २५०० कोटी रुपयांची गुंतवणूक करत आहोत. विविध प्रकारची ६० उत्पादने या कंपनीची देशभरात आहेत.
 
या कंपनीने हजारो कर्मचारी काम करतात. या कंपनीने २०२३ मध्ये भारतात एकूण १२८४० कोटी रुपयांचा व्यवसाय केला. अशी एक मोठी कंपनी इथे उभी राहत आहे त्यामुळे लोकांना चांगला रोजगार उभा राहिले. व्यवस्थापनाने स्थानिक लोकांना प्राधान्य कारखान्यात दिले पाहिजे, असा आग्रह यावेळी मुख्यमंत्र्यांनी धरला.