गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 27 डिसेंबर 2021 (11:27 IST)

पतीने पत्नीच्या सांगण्यावरून अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला

वर्धाच्या आर्वी पोलीस ठाणाच्या हद्दीतील एका गावात ही घटना घडली हे. या गावात एका विकृत मानसिकतेच्या महिलेने आपल्या पतीला गावात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करायला सांगितले. पतीने  बायकोच्या सांगण्यावरून अल्पवयीन मुलीवर बलात्कार  केला . या गावात  राहणारी एक अल्पवयीन मुलगी आपल्या कुटुंबियांसह राहते. एके दिवशी ही  मुलगी घरात एकटीच होती. आरोपी महिला या मुलीला आपल्या घरी घेऊन आली आणि माझ्या पतीसह लग्न कर म्हणून तिने मुलीला आपल्या पतीसह घरात कोंडून दार बाहेरून लावून निघून गेली. आरोपी पतीने परिस्थितीचा फायदा घेत मुलीवर लैंगिक अत्याचार केला. घरी आल्यावर पत्नीला हे कळल्यावर तिने पुन्हा त्या पीडित मुलीवर बलात्कार करण्यास पतीला सांगितले. पतीने पत्नीच्या सांगण्यावरून मुलीवर पुन्हा एकदा लैंगिक अत्याचार केला. घडलेला प्रकार कोणास सांगितला तर तुला ठार मारू. असे या दाम्पत्याने पीडित मुलीला सांगितले. घरी आल्यावर तिने घडलेला प्रकार आपल्या कुटुंबियांना सांगितला .मुलीवर झालेल्या अत्याचाराची तक्रार तिच्या कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात केली. पोलिसांनी फिर्याद दाखल करत आरोपी दाम्पत्यावर गुन्हा दाखल केला असून आरोपी दाम्पत्याला ताब्यात घेतलं असून पोलीस या दाम्पत्याने असे कृत्य का केले याचा तपास लावत आहे.