2 वर्षीय बालकाचा खेळता-खेळता बुडून मृत्यू
नागपूर- रामटेकजवळील नगरधनच्या तलावात एका धक्कादायक प्रकरणात दोन वर्षीय बालकाचा बुडून मृत्यू झाला आहे. शौर्य सागर माहुले असे मृत बालकाचे नाव आहे.
ही घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. शौर्य खेळता-खेळता तलावात गेल्याचे सांगितले जात आहे.
माहितीनुसार, नगरधन इंदिरानगर येथील सागर माहुले यांचा मुलगा शौर्य रविवारला सकाळी नऊ वाजेच्या सुमारास खेळता खेळता निघून गेला. तो दिसत नसल्याने गावात त्याचा सर्वत्र शोध घेतला गेला परंतु कुठेही आढळला नाही. तेवढ्यात शौर्य हरविल्याची चर्चा गावात पसरली. पोलिस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली.
नंतर काही नागरिकांना तलावात मुलाचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसला तेव्हा पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. शौर्य सागर माहुले हाच असल्याने पोलिसांनी आकस्मित मृत्यू नोंद केली.