वर्षा गायकवाड म्हणतात, तर शाळा पुन्हा बंद होण्याची शक्यता आहे
ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर केंद्राने राज्यांना महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. कडक निर्बंधाच्या सूचना केल्या आहेत. आता राज्यातहीरुग्ण वाढत आहे. हे लक्षात घेता मुंबईतल्या शाळांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झालाच तर शाळा पुन्हा बंद होण्याची शक्यता आहे, अशी माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.
ओमायक्रॉन बाधितांचा आकडा वाढत आहे. यापार्श्वभूमीवर सुरु झालेल्या शाळा बंद होणार का, अशी चर्चा सुरु झाली आहे. नाशिक आणि नवी मुंबईत शाळेतील काही विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे शाळा सुरु ठेवणार का, याबाबत सवाल उपस्थित करण्यात येत आहे. यावर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी भाष्य केले आहे. ओमायक्रॉनचे रुग्ण वाढले तर शाळा बंद करण्याचा निर्णय घेऊ शकतो, असे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे. सध्या आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत, असे वर्षा गायकवाड यांनी सांगितले.