1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified मंगळवार, 24 मे 2022 (08:32 IST)

उदयपूरच्या चिंतनानंतर शिर्डीत कार्यशाळा, काँग्रेसची तयारी जोरात

congress
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये लागोपाठच्या पराभवांमुळे नैराश्याच्या गर्तेत लोटल्या गेलेल्या काँग्रेस पक्षाचे नवसंकल्प शिबिर राजस्थानातील उदयपूर येथे नुकतेच पार पडले.
 
त्यामध्ये विविध निर्णय घेण्यात आले. मात्र, हे निर्णय केवळ कागदावर राहू नयेत, यासाठी पक्षाने कृतीला सुरवात केली आहे.महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने यासाठी कार्यशाळा आयोजित केली आहे.
 
एक आणि दोन जून रोजी शिर्डी येथे ही कार्यशाळा होणार आहे. यामध्य उदयपुर येथील मुद्द्यांची अंमलबजावणीसाठी राज्यातील कार्यक्रमाचे नियोजन करण्यात येणार आहे.