गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: मंगळवार, 2 एप्रिल 2019 (15:03 IST)

हेलेन ओबीरीने आयएएएफ क्रॉस कंट्रीमध्ये रचला इतिहास

माजी विश्व 5000 मीटर चॅम्पियन केनियाच्या हेलेन ओबीरीने आयएएएफ वर्ल्ड क्रॉस कंट्री चॅम्पियनशिपमध्ये ऐतिहासिक प्रदर्शनकरून रेकॉर्ड बुकमध्ये आपले नाव नोंदवण्यात यशस्वी झाली.   
 
या विजयासह ओबीरी जगातील पहिली महिला खेळाडू बनली आहे जिने सीनियर वर्ल्ड इंडोर, आउटडोअर आणि क्रॉस कंट्री शीर्षक जिंकले आहे. ओबिरीने 10.24 किलोमीटर मार्ग 36:14 सेकंदात पूर्ण केले आणि इथियोपियाच्या डेरा डिडापासून दोन सेकंद पुढे राहिली, जेव्हा की दोन वेळा वर्ल्ड 20 क्रॉस कंट्री चॅम्पियन लेटेसेनबेट गिडे ही 36:24 सेकंदात तीसर्‍या क्रमांकावर राहिली. 
 
केनिया आणि इथियोपियाने टीम रेस इव्हेंटमध्ये दोन शीर्ष पोझिशन मिळविल्या. हे दोन्ही देशांनी 2002 पासून ते आजपर्यंतच्या सर्व संस्करणांमध्ये आपल्या दोन शीर्षस्थावर कायम आहे.