रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: लंडन , शनिवार, 17 मार्च 2018 (12:26 IST)

पी. व्ही. सिंधूची उपान्त्यपूर्व फेरीत धडक

भारताची स्टार बॅडटिंनपटून पी. व्ही. सिंधूने ऑल इंग्लंड अजिंक्यपद स्पर्धेत उपान्त्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. थायलंडच्या नित्चाओन जिंदापोलवर तिने 21-12, 13-21, 21-18 अशा सेटमध्ये पराभव केला.
 
पहिल्या सेटमध्ये सिंधूने उत्तम खेळ करत तो सेट जिंकला. मात्र, दुसर्‍या सेटमध्ये तिचा खेळ काहिसा कमी  पडला. तिसर्‍या सेटमध्ये पुन्हा एकदा जबरदस्त खेळी करत तिने जिंदापोलला नमवले आणि उपान्त्यपूर्व फेरीत धडक मारली. मला आणखी चांगला खेळ करण्याची गरज आहे, हे मी जाणून आहे. हा सामना जिंकून मी उपान्त्यपूर्व फेरीत धडक मारली याचा आनंदही वाटतो आहे. आता पुढच्या सामन्यात माझी प्रतिस्पर्धी कोण असेल याचा विचार मी फारसा करत नाही. मी फक्त माझा खेळ आणखी चांगला करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. कदाचित माझा सामना इंडोनेशियाच्या नोझोमी ओकुहरा सोबत होऊ शकतो, असा अंदाज सिंधूने सामना संपल्यावर व्यक्त केला. 
 
जिंदापोलबाबत सिंधू म्हणाली की ती एक चांगली बॅडमिंटनपटू आहे. सुरुवातीला तिने मला काही गुण सहजपणे दिले. मात्र, दुसर्‍या सेटमध्ये तिने कमाल केली. असे असले तरीही मी तिसर्‍या सेटध्ये माझे कौशल्य पणाला लावले आणि तो सेट जिंकून विजय मिळवला, असेही सिंधूने स्पष्ट केले.