गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: मियामी , मंगळवार, 27 मार्च 2018 (12:55 IST)

मॅचपाईंट वाचवित व्हीनस चौथ्या फेरीत

माजी अग्रमानंकित असलेली व तीनवेळा विजेतेपद मिळविणारी अमेरिकेची व्हीनस विलियम्स हिने तीन मॅचपॉईंट वाचवित मियामी टेनिस स्पर्धेत महिला एकेरीची चौथी फेरी गाठली.
 
व्हीनस ही जगात सध्या आठव्या स्थानावर आहे. ती उपान्त्पूर्व फेरी माजी विजेती जोहाना कोन्टा हिच्याशी दोन हात करेल. तिसर्‍या फेरीत व्हीनसने किकी बेरटेन्स हिच्यावर 5-7,6-3, 7-5 अशी मात केली. पहिला सेट गमावल्यानंतर व्हीनसने पुन्हा उसळून वर येत दुसरा सेट घेतला.
 
तिसर्‍या निर्णायक सेटमध्ये तिने तीन मॅचपाईंट वाचविले. तिसर्‍या फेरीत जोहाना कोन्टाने बेल्जिमच्या इलिसे मेरटेन्स हिचा 6-2, 6-1 असा सरळ दोन सेटमध्ये पराभव केला.
 
37 वर्षाची व्हीनस ही पहिल्या सेटमध्ये 5-0 अशी आघाडीस होती. परंतु, तिने तीन सेट पाईंट गमाविले. जगात 29 व्या स्थानावर असलेल्या बेरटेन्सने पहिला सेट सलग गुण मिळवित 7-5 ने घेतला. त्यानंतर मात्र व्हीनसने जोरदार झुंज देत पुढचे दोन सेट घेत सामना जिंकला. स्वतःच्या सर्व्हिसवर तिला मॅचपाईंट वाचवावा लागला. तिने सामन्यातील शेवटचे चार गेम जिंकत सामना जिंकला. बेरटेन्सला थोड्याप्राणात क्रॅम्पचा त्रास झाला.