1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. बजेट 2020-21
Written By
Last Modified: नवी दिल्ली , शुक्रवार, 31 जानेवारी 2020 (11:55 IST)

स्मार्टफोन, टीव्ही, वॉशिंग मशीन महागण्याची शक्यता

चीनमधून प्रसार झालेल्या या विषाणूचा आता व्यापार जगतावरही परिणाम दिसयला सुरूवात झाली. किमान भारतातील इलेक्ट्रिक कंपन्यांचे हेच म्हणणे आहे. करोना विषाणूमुळे चीनमधून भारतात आयात केले जाणारे साहित्य आणि सूटे भाग (कंपोनेंट्‌स) यांच्यावर मोठा परिणाम झाला. त्यामुळे भारतात उत्पादनात कपात आणि नव्या उत्पादनांच्या लाँचिंगमध्ये उशीर होणार असल्याचे स्मार्टफोन आणि इलेक्ट्रॉनिक कंपनंनी म्हटले.
 
टेलिव्हिजन तयार करण्यासाठी वापरले जाणारे जवळपास 75 टक्के कंपोनेंट्‌स आणि स्मार्टफोन कव्हर्सचे 85 टक्के कंपोनेंट्‌स चीनमधून येतात. यामध्ये मोबाइल डिस्प्ले, ओपन सेल टीव्ही पॅनल, मुद्रित सर्किट बोर्ड, कॅपेसिटर, मेमरी आणि एलइडी चिप्स यांसारखे कंपोनेंट्‌स चीनमधून आयात केले जातात. याशिवाय एअर कंडीशनर कॉम्प्रेसर्स आणि वॉशिंग मशीनच्या मोटर्सची आयातही चिनी कंपनंद्वारे केली जाते.