गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. व्हॅलेंटाईन डे
Written By
Last Modified: सोमवार, 1 फेब्रुवारी 2021 (20:51 IST)

कोरोनाच्या दरम्यान व्हॅलेंटाइन कसा साजरा करावा

सहसा व्हॅलेंटाइन साजरा करणं सोपं आहे. बहुतेक लोक रेस्तराँमध्ये जातात आणि गुलाब, चॉकलेट आणि दागिने खरेदी करतात. पण यंदाच्या वर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे हे सहज नाही. कारण काही भागात कोविड -19 चे नवीन स्ट्रेन आले आहे. ही एक चिंतेची बाब आहे. बऱ्याच ठिकाणी पुन्हा लॉक डाउन लागण्याची स्थिती बनत आहे. अशा परिस्थितीत  व्हॅलेंटाइन कसा साजरा करावा?   या साठी आपल्याला थोडे परिश्रम करावे लागतील. जेणे करून आपण  व्हॅलेंटाइन डे चांगल्या प्रकारे साजरा करू शकाल.  
 
कोरोना विषाणूंच्या काळात तेच करावं जे नेहमी करत आहोत. असं करणं अवघड होऊ शकत. या वेळी सामाजिक अंतराचे पालन करावे लागणार. चला तर मग काही अशा सोप्या टिप्स जाणून घेऊ या जे आपल्याला आवडतील आणि कामी येतील.  
 
कोविड दरम्यान  व्हॅलेंटाइन डे वर काय करावं -
 
* बॅकिंग आणि होम ऍक्टिव्हिटी -
आपण कधी कुकीज बॅक केल्या आहेत? घरीच कुकीज बनवून आपण आपल्या जोडीदाराला सरप्राइज देऊ शकता. आपण केक, कुकीज बनवू शकता. बॅकिंग करणे हे सामान्य स्वयंपाक करण्यापेक्षा वेगळे असू शकत. आपण ही क्रिया ग्रुप ऍक्टिव्हिटी मध्ये देखील सामायिक करू शकता. या व्यतिरिक्त आपण घरातच ट्रेझर हंट आणि डेट ची योजना आखू शकता. असं केल्यानं आपले संपूर्ण दिवस घरातच मनोरंजक कामात निघेल.   
 
 * होम स्पा- 
आजकाल बऱ्याच सेवा होम स्पा ऑफर देतात आणि आपण कोणत्याही हस्तक्षेपाशिवाय होम स्पा नियोजन करू शकता. आपण काही शीट मास्क, स्नॅक्स, मासिके, अरोमा थेरेपी कँडल, लाइट म्युझिक, स्पा क्रीम इत्यादी वापरू शकता.  
किंवा घरातच खूप फुलांनी आपले घर सजवू शकता आणि महागड्या स्पाचे ट्रीटमेण्ट देखील देऊ शकता. आता हे चांगले ट्रीटमेण्ट होऊ शकत.
 
* होम सिनेमा नाइट- 
आपल्याला आपल्या जोडीदारासह खूपच रोमँटिक रात्र घालवायचे इच्छुक आहात तर एकाद्या फॅन्सी डिनर सह चांगल्या चित्रपटाचा आनंद घेऊ शकता. दिल्या जाणाऱ्या भेटवस्तू आपण आधीच तयार करून ठेवा. आपल्या आवडत्या रेस्टॅरेंट मधून आवडीचे जेवण मागवू शकता आणि  रात्री च्या चित्रपटाचा आनंद घेऊ शकता.