International Yoga Day 2021: योगासनाचे हे नियम जाणून घ्या
योगा हा आपल्या जीवनाचा एक भाग बनला आहे. आजच्या वेगवान जीवनात, जिथे लोक स्वत: ला निरोगी ठेवण्यासाठी अनेक खास गोष्टी करतात, तिथे योगाकडे लोकांचा कलही सतत वाढत आहे. लोक योगा करीत आहेत आणि त्याचे फायदे मिळतात.काहीजण घरी योगा करतात, तर काही स्वत: ला निरोगी व तंदुरुस्त ठेवण्यासाठी योगा वर्गात जातात.आजच्या युगात प्रत्येकजण योगाशी निगडित आहे. योगाचे महत्त्व ओळखून आणि त्याबद्दल लोकांना जागरूक करण्यासाठी आंतरराष्ट्रीय योग दिन प्रत्येक वर्षी 21 जून रोजी साजरा केला जातो. योगा केल्याने शरीराला फायदे मिळतात यात काही शंका नाही, परंतु योगासन करताना लक्षात ठेवले पाहिजे की याचे काही नियम आहे ते पाळलेच पाहिजे,योगाचे कोणते नियम आहेत हे समजून घेणे आवश्यक आहे. चला तर मग जाणून घेऊ या.
* योगासनाच्या पूर्वी काही खाऊ शकतो का? योगासनांच्या पूर्वी चहा पिऊन आपण योगा करू शकता.या व्यतिरिक्त आपण योगा करण्याच्या 2 तास पूर्वी दलिया किंवा ओट्स घेऊ शकता.योग करण्याच्या अर्धा तासापूर्वी आपण ज्यूस किंवा ग्लुकोज घेऊ शकता.आणि एक तासापूर्वी पर्यंत आपण दह्याचे सेवन करू शकता.
* योगा केल्यावर काय खावं- योगा केल्यावर आपण न्याहारी घेऊ शकता,जी पौष्टीक असावी.या साठी आपण दलिया, ब्रेड-बटर,दूध,दही,ओट्स देखील घेऊ शकता.या व्यतिरिक्त आपण सकाळी न्याहारी केल्यावर आणि दुपारच्या जेवण्याच्या वेळेच्या दरम्यान फळांचे सेवन करू शकता.
* अनोश्या पोटी योगा करू शकतो -योग हे आपल्या शरीरासाठी फायदेशीर आहे,परंतु हे लक्षात ठेवा की जेवल्यानंतर लगेच योगा करू नका.मग ती सकाळची वेळ असो,किंवा संध्याकाळची असो.जेवण्याच्या 3 तासानंतरच योगा करायचे आहे.योग करण्याची सर्वात योग्य वेळ सकाळची मानलेली आहे.अनोश्या पोटी योग केल्याने शरीराला फायदा मिळतो.जर आपल्याकडे सकाळी योगा करण्याचा वेळ नाही तर आपण रात्री देखील योगा करू शकता.या साठी आपल्याला जेवण्याच्या अर्धातासापूर्वी योगा करायचे आहे.योगा करताना आपले पोट भरलेले नसावे.