रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. करिअर मार्गदर्शन
Written By
Last Modified: सोमवार, 25 एप्रिल 2022 (15:34 IST)

दहावी उत्तीर्ण झाल्यावर काय करावे?

10ஆம் வகுப்பு தேர்வு ரத்தால் ஏற்பட்டுள்ள நடைமுறை சிக்கல்கள்!
विद्यार्थ्यांसाठी अभ्यास किती महत्त्वाचा आहे हे आपणा सर्वांना माहीत आहे, कोणी आपल्या चांगल्या भविष्यासाठी, कोणी चांगल्या नोकरीसाठी तर कोणी आपले ज्ञान वाढवण्यासाठी अभ्यास करतात. पण दहावी उत्तीर्ण झाल्यावर सर्वच विद्यार्थी थोडे गोंधळात पडतात की त्यांनी पुढे कोणत्या विषयात शिक्षण घ्यायचे?
 
दहावीनंतर, योग्य विषय निवडणे आपल्यासाठी खूप महत्वाचे आहे कारण यावर आपले भविष्य अवलंबून असते आणि आपल्याला या विषयाचा अभ्यास इयत्ता 11वी आणि 12वी मध्ये करावा लागतो. अनेक पर्याय आपल्या समोर आहेत.10वी नंतर मुख्यतः 3 पर्याय आहेत त्यापैकी कोणताही एक पर्याय निवडू शकता.
1 कला वर्ग
2 विज्ञानाचा वर्ग
3 व्यावसायिक किंवा वाणिज्य वर्ग 
 
1 कला
10वी नंतर निवडला जाणारा हा सर्वात लोकप्रिय विषय आहे . 10वी बोर्डाला 50℅ किंवा त्यापेक्षा कमी गुण मिळालेले विद्यार्थी हे निवडू शकतात. यामध्ये अनेक प्रकारचे विषय शिकवले जातात, त्यापैकी काही खालीलप्रमाणे-
 
* भूगोल
* राज्यशास्त्र
* अर्थशास्त्र
* संस्कृत
* समाजशास्त्र
* मानसशास्त्र
* इतिहास
* इंग्रजी
* तत्वज्ञान
* ड्रॉईंग 
 
10वी नंतर कला विषय निवडण्याचे फायदे-
 
* 10वी नंतर आर्ट्स घेण्याचे अनेक फायदे आहेत, जसे की कॉमर्स आणि सायन्सच्या तुलनेत आर्ट्स घेणाऱ्या विद्यार्थ्यांवर कमी दबाव असतो.
* कला शाखेची निवड करून, विद्यार्थ्यांना शिकवणी किंवा कोणतेही वर्ग घेण्याचीही गरज नाही.
* सर्वात मोठा फायदा म्हणजे कलाचे विद्यार्थी आयएएस, आयपीएस इत्यादी नागरी सेवा परीक्षांची तयारी करू शकतात. कारण नागरी सेवांमधून कला विषय विचारले जातात.
* वाणिज्य आणि विज्ञानाच्या तुलनेत, कला विषय किंवा अभ्यासक्रमासाठी शुल्क देखील कमी आहे.
 
2 विज्ञान
जे विद्यार्थी अभ्यासात खूप वेगवान आहेत ते निवडू शकतात.हा विषय थोडा अवघड आहे. विज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी तुम्हाला 10वीमध्ये 50℅ पेक्षा जास्त गुण मिळवावे लागतात. विज्ञान वर्गात 2 भाग असतात-
 
* वैद्यकीय- जर तुम्हाला डॉक्टर / शास्त्रज्ञ व्हायचे असेल तर हे ते निवडावे लागेल. यामध्ये  फिजिक्स , केमिस्ट्री सोबत जीवशास्त्र (बायोलॉजी)शिकवले जाते . 
* नॉन मेडिकल (तांत्रिक) - आणि जर तुम्हाला अभियंता व्हायचे असेल तर हे निवडा. यामध्ये तुम्हाला फिजिक्स, केमिस्ट्री सोबत गणित शिकवले जाते.
 
10वी नंतर विज्ञान निवडण्याचे फायदे-
 
* विज्ञान प्रवाहात अभियांत्रिकी , वैद्यकीय, आयटी सारखे अनेक उत्तम करिअर पर्याय उपलब्ध आहेत.याशिवाय विद्यार्थी संशोधनातील पर्यायही शोधू शकतात.
* विज्ञान घेण्याचा सर्वात मोठा फायदा हा आहे की ते विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात पुढील पर्याय खुले करते. विद्यार्थी विज्ञान शाखेतून वाणिज्य किंवा कला शाखेतील अभ्यासक्रम निवडू शकतात, परंतु वाणिज्य आणि कला शाखेचे विद्यार्थी विज्ञान विषयातील अभ्यासक्रम निवडू शकत नाहीत.
* विज्ञान क्षेत्र खूप प्रगत आहे आणि यापुढेही संशोधन चालू राहिले तर करिअरच्या अमर्याद संधी आहेत.
 
3 वाणिज्य-
कला नंतर वाणिज्य हा दुसरा सर्वात प्रसिद्ध विषय आहे. ज्या विद्यार्थ्यांनी 10वी मध्ये 40℅ किंवा त्याहून अधिक गुण मिळवले आहेत ते ते निवडू शकतात आणि जर आपल्याला  बँकिंग क्षेत्रात रस असेल तर ते निवडू शकता. यामध्ये खालील विषय शिकवले जातात-
 
* अकाउंटन्सी
* बिझिनेस स्टडी 
* इंग्रजी
* अर्थशास्त्र
* गणित
 
10वी नंतर कॉमर्स निवडण्याचे फायदे
* 10वी नंतर कॉमर्सचा अभ्यास करणार्‍या उमेदवारांकडे पदवीचे अनेक पर्याय आहेत आणि CA , CS , MBA , HR इत्यादी अनेक करिअर पर्याय आहेत.
* कॉमर्सचा अभ्यास करण्याचा आणखी एक मोठा फायदा म्हणजे गुंतवणूकीचे ज्ञान.
 * उमेदवाराला कळेल की त्याने ती गुंतवणुकीत कुठे गुंतवावी. बहुतेक लोक म्युच्युअल फंड, एफडी आणि शेअर बाजाराकडे वळतात .
* जर उमेदवाराला संख्या आणि संख्यात्मक डेटाचे विश्लेषण करण्यात रस असेल तर वाणिज्य हा सर्वोत्तम पर्याय उपलब्ध आहे.
* बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन ते फायनान्स यासारख्या क्षेत्रात करिअरचे अमर्याद पर्याय आहेत .