1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: शनिवार, 16 ऑक्टोबर 2021 (08:40 IST)

राज्यात शुक्रवारी २ हजार १४९ नवीन करोनाबाधित दाखल

राज्यात पुन्हा एकदा दिवसभरात आढळलेल्या करोनाबाधितांची संख्या ही करोनातून बरे झालेल्यांच्या तुलनेत अधिक आढळून आली. राज्यात शुक्रवारी  २ हजार १४९ नवीन करोनाबाधित आढळले, तर १ हजार ८९८ रूग्ण करोनामधून बरे झाले. तसेच, २९ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू देखील झाला.
 
राज्यात आजपर्यंत एकूण ६४,१५,३१६ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट ) ९७.३७ टक्के एवढे झाले आहे.
 
आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६५,८८,४२९ झाली आहे. तर, राज्यात आजपर्यंत १३९७३४ करोनाबाधितांचा मृत्यू झालेला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के एवढा आहे.
 
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६,०८,०९,०५४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६५,८८,४२९(१०.८३ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २,२७,४६७ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १,००२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण २९,७८२ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.