तिरूपती देवस्थान मंदिराच्या ७४३ कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग
तिरुमला तिरूपती देवस्थान मंदिराच्या (टीटीडी) ७४३ कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. मंदिराशी संबंधित तीन जणांना करोनामुळे मृत्यू झाला आहे.
‘तिरुमला तिरुपती देवस्थानम्’चे कार्यकारी अधिकारी अनिल कुमार सिंघल यांनी यासंदर्भात पत्रकारांशी संवाद साधताना माहिती दिली. “११ जून नंतर देवस्थानाशी संबंधित ७४३ कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. यापैकी तीन जणांचा मृत्यू झाला आहे. ४०२ कर्मचाऱ्यांनी कोरोनावर मात केली असून ते यामधून पूर्णपणे बरे झाले आहेत. तर ३३८ जणांवर सध्या वेगवेगळ्या कोरोना केंद्रांवर उपचार सुरु आहेत,” असं सिंघल यांनी सांगितलं.
मंदिर सुरु झाल्यानंतर अवघ्या आठवड्याभरामध्येच म्हणजेच १६ जून रोजी मंदिराच्या १४ पुजाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली होती. सिंघल यांनीच यासंदर्भातील माहिती त्यावेळी दिली होती. १४ पुजाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर इतर पुजाऱ्यांची एक बैठक घेतली आणि त्यांना आरोग्यविषयक सूचना करण्यात आल्या होत्या. या मंदिरात एकूण ५० पूजारी आहेत. त्यापैकी १४ पुजाऱ्यांना मंदिर सुरु झाल्यानंतर पहिल्या आठवड्यातच
कोरोनाची बाधा झाल्याचे दिसून आलं.