शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: शुक्रवार, 22 ऑक्टोबर 2021 (11:55 IST)

कोरोना परतला ! चीनमध्ये कोरोनाचं पुनरागमन; पुन्हा दहशतीचं वातावरण निर्माण विमान उड्डाणे रद्द, शाळा बंद, लोक घरात कैद झाले

कोरोना व्हायरस पुन्हा एकदा चीनमध्ये पसरताना दिसत आहे, ज्याने संपूर्ण जगात कोरोना व्हायरस पसरवला आहे. कोरोनाची वाढती प्रकरणे येथे नोंदवली जात आहेत. ज्याच्या पार्श्वभूमीवर सरकार देखील सज्ज झाली आहे आणि अनेक कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. चीनमध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सरकारने शेकडो उड्डाणे रद्द केली आहेत. प्रभावित भागात शाळा बंद करण्यात आल्या आहेत आणि काही ठिकाणी लॉकडाऊनही लागू करण्यात आले आहे. सरकारने लोकांना गरज असेल तेव्हाच बाहेर पडण्यास सांगितले आहे. या व्यतिरिक्त, व्हायरलशी लढण्यासाठी, सरकारने मोठ्या प्रमाणावर चाचणी सुरू केली आहे.
 
चीन नेहमीच विषाणूबाबत सावध आहे आणि शून्य धोरणाचे पालन करतो. त्याच्या सीमा कडक केल्या आणि लॉकडाऊनचे काटेकोरपणे पालन केले.  इतर देश कोरोना निर्बंध शिथील करत असताना , चीनमध्ये कोरोना प्रतिबंधांचे काटेकोरपणे पालन केले जात होते. परंतु हे सर्व असूनही, एकदा कोरोनाची नवीन प्रकरणे चीनमध्ये दिसू लागली आहेत.
 
आतापर्यंत चीनमध्ये देशांतर्गत स्तरावर कोरोना विषाणूवर नियंत्रण ठेवले गेले आहे, परंतु सलग पाचव्या दिवशी कोरोनाचे नवे प्रकरण पाहून देशाची चिंता वाढली आहे. चीनमधील यापैकी बहुतेक प्रकरणे देशातील उत्तर आणि उत्तर पश्चिमी प्रांतांतून नोंदवली गेली आहेत. सरकारने या भागात निर्बंध कडक केले आहेत. पर्यटकांच्या गटाचा भाग असलेल्या वृद्ध जोडप्याला नवीन प्रकरणांसाठी जबाबदार धरले जात आहे.
 
हे जोडपे गांसु प्रांतातील सियान आणि इन मंगोलियामध्ये आले. त्यांच्या यात्रे दरम्यान कोरोनाची अनेक प्रकरणे नोंदविण्यात आली आहे. बीजिंगसह पाच प्रांतांमध्ये असे संक्रमित लोक आढळले आहेत जे या जोडप्याच्या संपर्कात आले होते.
 
कोरोनाला सामोरे जाण्यासाठी चीन सरकारने मोठ्या प्रमाणावर चाचण्या घेण्यास सुरुवात केली आहे आणि पर्यटन स्थळे देखील बंद केली आहेत. या व्यतिरिक्त, त्या ठिकाणी शाळा आणि मनोरंजनाची ठिकाणे बंद करण्यात आली आहेत, जिथे विषाणूचा प्रादुर्भाव अधिक दिसून आला आहे. अनेक भागातील नागरिकांना आवश्यकतेनुसारच घराबाहेर पडण्याचा सल्ला देण्यात आला आहे.