शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. गणेशोत्सव
  3. गणेश महिमा
Written By
Last Modified: रविवार, 16 सप्टेंबर 2018 (00:13 IST)

गणेशलोक किंवा स्वर्गलोक

अनन्तविभवायेव परेशां पररूपिणे।
 
शिवपुत्रास देवाय गुहाग्रजाय ते नम:॥
 
समर्थ रादासांच ते देवाचा तिसरा प्रकार म्हणजे सगुणनिराकार देवाचा. या देवाजवळ चेतना असते, पण शरीर नसते. त्यामुळे त्याच्याजवळ प्राकृतिक सुखदुःखे नसतात. शारीरिक सुख-  दुःखाच्या पार असलेली मुक्तता त्यांना उपलब्ध असते. परंतु त्यांना शरीर नसले तरी वासना इच्छा त्यांच्या ठिकाणी असतातच म्हणून पंचतत्त्वातील पृथ्वी आणि आप अशा दोन तत्त्वातून या चेतना मुक्त झालेल्या असतात. तेज, वायू आणि आकाश या तीन सूक्ष्म तत्त्वातच त्या नांदत असतात आणि म्हणूनच त्यांच्या वासनापूर्तीच आड स्थळ-काळाचे बंधन उरलेले नसते. अशा स्वरूपात वावरणार्‍या शुद्ध चेतनेच्या निवासस्थानालाच आपण 'गणेशलोक' किंवा स्वर्गलोक' म्हणतो!
 
श्रीगणेशासमोर ध्यान लावून बसल्यावरती जो आनंद होतो, तो आनंद म्हणजेच स्वर्गलोक. जिथे संकल्पमात्रे करून कुठलीही इच्छा तत्काळ पूर्ण होते. मन सकारात्मक घडत जाते. कल्पवृक्ष, कामधेनू इत्यादि संकल्पनांचे हेच स्वर्गीय  स्वरूप आहे. शरीर अगदी हलके, फक्त कानाला देवाचच नामाचा आवाज येतो आणि कसलेही भास नाहीत यालाच सगुण-निराकार देवाचे अस्तित्व म्हणायचे!
 
आणि आता चौथ्या प्रकारचा देव, की ज्याला निर्गुण निराकार म्हटले तो. त्यालाच कोणी ङङ्ग। ऐ 'परमात्मा' म्हणतात, तर कोणी 'जगन्नियंता' 'ब्रह्मा-विष्णू-शिवमहादेव-गणेश'अशा विविध नावांनी ओळखतात. त्याचा निर्गुणपणाच जगातील सर्वगुणांचा आधार आहे. त्याच्या निराकार रूपातच जगातील सर्व रूपे उपजतात आणि विलीन होतात. विश्वातील दृश्-अदृश् सर्व दिव्यत्वाच्या मागे याच एका ब्रह्मशक्तीचा हात दडलेला आहे. ही परमशक्तीच अनादिअनंत आहे. बाकीचे वर्णन केलेले तीन देव हे एकाहून एक श्रेष्ठ असले तरी आदि-अंतातून मुळीच मुक्त नाहीत. 
 
गणेश उपासनेच्या शोधाचा आणि त्यातून होणार बोधाचा विचार करताना असेच दिसून येते की, आजकाल लोक पहिल्या प्रकारातील जड प्रतिमांच्याच भजन-पूजनात हरवून गेलेले आहेत. खर्‍या अर्थाने हे सर्व सध्याच्या धकाधकीच्या जीवनात फार कठीण आहे. जीवनाचा मार्ग मुक्तीचा शोध घ्यायला लावणारा असला तरी सध्या मोक्ष-मुक्ती याचा विचार कर्मात करता ययाला हवा आहे. 'आधी प्रपंच करावा नेटका' अशी स्थिती फक्त डोकं वर काढत आहे. त्यामुळे  गीतेचा उपदेश लक्षात घेऊन चांगले कर्मच मनुष्याच्या मक्तीचे कारण व्हावे, असे मला वाटते. ध्यानाने मन शांत होते. आणि मौनाने कलह व जपाने पापांचा नाश, ही त्रिसूत्री सर्वांनीच ध्याता ठेवावी. 
 
ज्यांना निर्गुण-निराकाराचा अभ्यास करायचा असेल तर उत्तमच, परंतु वेळेअभावी किमान श्रीगणेशाचे स्मरण नक्कीच करावे. आपण देवाचे प्रकार पाहिले. 
 
संकल्पनेतून साकार झालेल्या त्या देवाचा प्रवास म्हणजे फक्त आणि फक्त सकारात्मकता होय. हीच सकारामत्कता मोक्ष मिळवून देते. श्रद्धाळू होण्यासाठी काही अनुभवच यायला हवेत का? अनुभव येण्यासाठी देवावर विश्वास हवा. हा विश्वास मिळवण्यासाठी उपासनेची गरज असते आणि ती उपासना म्हणजे देव गजाननाची उपासना होय.
विठ्ठल जोशी