कोरोनाच्या कालावधीत तीन प्रकारच्या आहाराबद्दल जाणून घ्या, कोणतं श्रेष्ठ स्वत: ठरवा

Last Modified शुक्रवार, 20 नोव्हेंबर 2020 (09:43 IST)
असे म्हणतात की आपण जे काही खातो आपले मन देखील तसंच बनतं. जसे मन असेल तसेच विचार आणि भावना देखील येतात आणि जसे विचार आणि भावना असते तसेच आपले भविष्य आणि व्यवहार असतो. अर्थात आपण जसे खातो तसेच विचार आणि व्यवहार करतो.

आपल्या हिंदू धर्मात अन्नाचे तीन प्रकार सांगितले आहेत. सात्त्विक आहार, राजसिक आहार आणि तामसिक आहार. इथे आपणास थोडक्यात त्यांची माहिती देत आहोत.

1 सात्त्विक आहार - ताजे आणि शुद्ध शाकाहारी आणि चांगले जेवण सात्त्विक आहार म्हणवले जातं. या अन्नात लसूण, कांदा, वांगी आणि फणस सारख्या उत्तेजना वाढवणारे घटकांचा वापर केला जात नाही. कारण असे अनेक शाकाहारी पदार्थ आहे जे राजसिक आणि तामसिक आहाराच्या अंतर्गत येतात. दूध, दही, तूप, लोणी, मध, तुती, हिरव्या पाले भाज्या, नारळ, खडीसाखर, खीर, पंचामृत, भात हे सगळं सात्त्विक अन्न समजले जातं. हे अन्न रसाळ किंचित वंगण असलेले आणि पौष्टिक असतं. यामध्ये दूध, लोणी, तूप, ताक, हिरव्या पालेभाज्या, फळ, सुकेमेवे समाविष्ट आहे. या शिवाय लिंबू, नारंगी, आणि खडीसाखरेचा पाक, लस्सी या सारखे पातळ पदार्थ फायदेशीर आहे.
परिणाम - सात्त्विक अन्न द्रुत पचण्या योग्य आहेत. ते मन केंद्रित करतं आणि पित्त देखील शांत राहतं. खाण्या पिण्यात हे पदार्थ असल्यावर अनेक रोग आणि आरोग्याशी निगडित समस्या टाळता येऊ शकतात. शास्त्रात म्हटले आहे की सात्त्विक अन्न खाल्ल्याने माणसाचे मन स्वच्छ आणि सकारात्मक विचारसरणीचे आणि मेंदू शांत राहतं. या मुळे शरीर निरोगी बनतं. सात्त्विक अन्नामुळे माणूस चेतनांचा तळा वरून उठून निर्भयी आणि हुशार बनतो.
2 राजसिक आहार - लसूण, कांदा, मसालेयुक्त, तिखट, चमचमीत असे जेवण राजसिक आहारात येतं. यामध्ये मांसाहाराचा देखील समावेश असतो. फक्त तेच मांसाहार जे निषिद्ध नाही. निषिद्ध मांसाहार तामसिक जेवणाच्या अंतर्गत येतं. काही लोकांच्या मते मांसाहार जेवण हे राजसिक आहारात सामील नाही. आधुनिक अन्नाला राजसिक अन्न म्हटलं जाऊ शकतं. जसे की न्याहारीत असलेले सर्व आधुनिक शक्तीवर्धक पदार्थ, शक्तिवर्धक औषध, चहा, कॉफी, कोको, सोडा, पान, तंबाकू, मद्यपान आणि व्यसनाचे सर्व प्रकार यात समाविष्ट आहे.
परिणाम - सध्याच्या काळात होत असलेल्या बऱ्याच आजाराचे मूळ कारण अशा प्रकाराचे अन्न आहेत. राजसिक खाद्यपदार्थाचा चुकीचा वापर किंवा अधिक वापर केल्यानं कधी कोणता त्रास उद्भवेल किंवा कधी कोणता आजार होईल हे सांगता येणं अवघड आहे. राजसिक अन्नामुळे उत्तेजना वाढते आणि यामुळे माणसात राग आणि चंचलता बनून राहते. राजसिक अन्नामध्ये व्यक्तीला आयुष्यभर ताणतणाव, चंचल, भित्रा आणि अति भावनिक बनवून संसारात गुंतवून ठेवतं.
3 तामसिक आहार - या मध्ये प्रामुख्यानं मांसाहार मानला जातो, पण शिळे आणि विषम आहार देखील समाविष्ट आहे. एखाद्याचे फेकलेले, उष्टे, खराब झालेले अन्न, निषिद्ध प्राण्याचा मांस, जमीनीवर पडलेले, घाणेरड्या पद्धतीने बनवलेले, स्वच्छ पाण्याने न धुतलेले इत्यादी अन्न तामसिक असतात. पुन्हा-पुन्हा गरम केलेले अन्न, कृत्रिम पद्धतीने बनवलेले, फ्रीजमध्ये ठेवलेले. तळकट, चरबीयुक्त, आणि जास्त गोड जेवण देखील तामसिक अन्न असतं.
परिणाम - तामसिक अन्न खाल्ल्यानं राग, आळस, जास्त झोप, नैराश्य, कामभावना, आजार आणि नकारात्मक भावनांनी ग्रस्त होऊन चेतना हरपते. तामसिक जेवण केल्याने चेतना हरपते, या मुळे एखादी व्यक्ती मूर्ख बनून अन्न आणि लैंगिक सुखातच रमणारी असते.


यावर अधिक वाचा :

दैनिक राशिभविष्य

काय सांगता, प्रभू श्रीराम पंचवटी नाशिक मध्ये राहिले या 8 ...

काय सांगता, प्रभू श्रीराम पंचवटी नाशिक मध्ये राहिले या 8 गोष्टी जाणून घेऊ या
वाल्मिकी रामायण, अरण्यकांड मध्ये पंचवटीचे रंजक वर्णन आढळते. या शिवाय पंचवटीचे वर्णन ...

घरात तुळस लावली आहे हे नियम लक्षात ठेवा

घरात तुळस लावली आहे हे नियम लक्षात ठेवा
सनातन धर्मात तुळस ही अतिशय पूजनीय मानली आहे. ही केवळ पूजेसाठीच नव्हे तर औषधी गुणधर्मासाठी ...

हरिद्वाराचा लक्ष्मण झूला : भारताचे प्रेक्षणीय आणि पर्यटन ...

हरिद्वाराचा लक्ष्मण झूला : भारताचे प्रेक्षणीय आणि पर्यटन स्थळ
उत्तरांचल प्रदेशात गंगेच्या काठावर वसलेली कुंभ शहर हरिद्वार मायापुरी नावाने देखील ओळखले ...

वसंत पंचमी 2021 : वसंत पंचमी साठी विध्यार्थ्यानी काय करावं ...

वसंत पंचमी 2021 : वसंत पंचमी साठी विध्यार्थ्यानी काय करावं जाणून घ्या
यंदाच्या वर्षी वसंत पंचमी 16 फेब्रुवारी रोजी येत आहे. सरस्वती वसंत पंचमीचे शुभ मुहूर्त ...

गुरूपुष्यामृत योगाचे महत्त्व

गुरूपुष्यामृत योगाचे महत्त्व
ज्योतिष शास्त्रात ग्रह, नक्षत्र, वार, करण, तिथी, मास आदी महत्त्वपूर्ण घटक असतात. त्यांचा ...

Mi 10i आज 108 मेगापिक्सेल कॅमेर्‍यासह भारतात लॉन्च होईल! ...

Mi 10i आज 108 मेगापिक्सेल कॅमेर्‍यासह भारतात लॉन्च होईल! किंमत किती असेल जे जाणून घ्या
शाओमी (Xiaomi) 2021 च्या पहिल्या व्हर्च्युअल लाँच इव्हेंटसाठी सज्ज आहे. कंपनी आज (5 ...

New Covid lockdown in England: नवीन कोरोना विषाणूच्या ...

New Covid lockdown in England: नवीन कोरोना विषाणूच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा ब्रिटनमध्ये कडक लॉकडाउन लागू करण्यात आला
बोरिस जॉनसन यांनी लोकांना या घोषणेसह घरी राहण्याचे आवाहन केले. लॉकडाऊनच्या घोषणेनंतर आता ...

लॉकडाउननंतर मद्यपान करणार्‍यांची संख्या दुप्पट, रूग्णालयात ...

लॉकडाउननंतर मद्यपान करणार्‍यांची संख्या दुप्पट, रूग्णालयात 48.5 टक्के रुग्ण पोहोचले
कोरोना साथीच्या चिंतेमुळे एकीकडे लोक स्वत:ला घरातच कैद करू लागले. दुसरीकडे, लोकांनीही ...

बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ

बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ
राज्य मंडळातर्फे घेण्यात येणार्‍या बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास १५ डिसेंबरपासून ...

गजबजलेल्या रस्त्यावर एकतर्फी प्रेमातून २२ वर्षीय तरुणीची ...

गजबजलेल्या रस्त्यावर एकतर्फी प्रेमातून २२ वर्षीय तरुणीची हत्या
मुंबईच्या गजबजलेल्या रस्त्यावर एका तरुणाने एकतर्फी प्रेमातून २२ वर्षीय तरुणीची हत्या करत ...