शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: बुधवार, 26 ऑगस्ट 2020 (16:26 IST)

हिंदू धर्मात हत्ती पूजनीय प्राणी का आहे, जाणून घेऊ या 5 कारणे...

भारतीय धर्म आणि संस्कृतीमध्ये हत्तीचे खूप महत्त्व आहे. हत्तीला पूजनीय मानले गेले आहे. हत्तीशी निगडित अनेक गोष्टी, किस्से आणि पौराणिक कथा भारतात देखील लोकप्रिय आहे. चला तर मग जाणून घेऊ या की हत्तीला पूजनीय का मानले आहेत.

1 गायी प्रमाणे हत्ती देखील प्राचीन भारतातील पाळीव प्राणी आहेत, विशेषतः दक्षिण भारतात, प्राचीन काळात हत्ती जास्त प्रमाणात असायचे. हे अशाच प्रकारे आहे की ज्या देशांमध्ये घोडे जास्त प्रमाणात असायचे, त्यांचा साठी घोडे महत्त्वाचे असायचे. हिंदुस्तानामध्ये प्राचीन काळापासून राजे महाराजे आपल्या सैन्यात हत्तींचा समावेश करीत असे. प्राचीन काळात राजांकडे मोठ्या प्रमाणात हत्तींचे मोठे सैन्य असायचे जे विरोधी पक्षात शिरून संहार करायचे. म्हणून हत्ती पूजनीय असायचे.

2 भारतात बहुतेक देऊळांच्या बाहेर हत्तीची मूर्ती लावली जाते. वास्तू आणि ज्योतिषानुसार भारतातील घरांमध्ये देखील चांदी, पितळ आणि लाकडाचा हत्ती ठेवण्याची प्रथा आहे. असे म्हणतात की ज्या घरात हत्तीची मूर्ती ठेवलेली असते त्या घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदते. हत्ती घर, देऊळ आणि महाल किंवा राजवाड्याचे वास्तुदोष दूर करून त्या ठिकाणांचे सौंदर्य वाढवते.

3 हिंदू पौराणिक मान्यतेनुसार हत्तींचे जन्म चार दात असलेल्या ऐरावत नावाच्या पांढऱ्या हत्ती पासून झाले आहेत. म्हणजे जसे माणसाचे पूर्वज बाबा आदम किंवा स्वयंभू मनू आहेत. त्याच प्रमाणे हत्तीचे पूर्वज ऐरावत आहे. ऐरावताची उत्पत्ती समुद्र मंथनाच्या वेळी झाली होती आणि इंद्राने त्याला आपल्याकडे ठेवून घेतले होते. ऐरावत पांढऱ्या हत्तीचे राजा होते. 'इरा' म्हणजे पाणी आहे, म्हणूनच 'इरावत'(समुद्र) पासून उत्पन्न झालेल्या हत्तीला ऐरावत नाव दिले गेले आहे. म्हणूनच त्याचे 'इंद्र हस्ती' किंवा 'इंद्रकुंजर' नाव देखील पडले. गीतामध्ये देखील श्रीकृष्ण म्हणतात की हे अर्जुन हत्ती मध्ये मी ऐरावत आहे.

4 या प्राणींचे संबंध विघ्नहर्ता गणपतीशी आहे. गणेशाचा चेहरा हत्तीचा असल्यामुळे त्यांचे गजतुंड, गजानन इत्यादी नाव आहेत. म्हणूनच हत्ती हा देखील हिंदू धर्मातील सर्वात पूजनीय प्राणी मानला जातो. हिंदू धर्मात आश्विन महिन्यातील पूर्णिमेच्या दिवशी गजपूजाविधी उपवास केले जाते. सौख्य समृद्धीच्या इच्छेसह हत्तीची पूजा करतात. हत्तीची पूजा करणे म्हणजे गणपतीची पूजा करणे मानले जाते. हत्ती शुभ शकुनाचे आणि लक्ष्मी प्रदायी मानले जाते.

 5 श्रीमद्भागवत पुराणानुसार हत्तीने केलेल्या विष्णूच्या स्तुतीचे वर्णन आढळते. असे म्हणतात की क्षीरसागरात
त्रिकूट डोंगराच्या घनदाट अरण्यात, अनेक हत्तीच्या सोबत हत्तीचे प्रमुख गजेंद्र नावाचा हत्ती राहायचा. गजेंद्र मोक्ष कथेत याचे वर्णन आढळते. गजेंद्र नावाच्या एका हत्तीचा एका नदीच्या काठी एका मगराने पाय धरला त्याने आपले प्राण वाचविण्यासाठी श्री विष्णूंची स्तुती केली. श्री हरी विष्णूंनी गजेंद्राला मगरीच्या तावडीतून सोडवले होते. असे म्हटले जाते की हे गजेंद्र पूर्वीजन्मी इंद्रद्युग्म नावाचे राजा असे जे द्रविड देशाचे पांड्यवंशी राजा असे.