रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 4 जुलै 2018 (09:29 IST)

जागाचा श्वास थांबवणारे गुहेतील १३ मुले सापडली. मात्र अजून सुटका नाही

थांम लुआंग नांग नोन गुहेत बेपत्ता झालेल्या थायलंडमधील चियांग राय प्रांतातील फुटबॉल संघाचा अखेर नऊ दिवसांनी शोध लागला. थाय फुटबॉल संघांतली जवळपास ११ ते १६ वयोगटातील एकूण १२ मुलं गेल्या काही दिवसांपासून आणि त्यांचे प्रशिक्षक या गुहेत अडकले होते. संघाचा शोध घेण्यासाठी बचावकार्य सुरू होतं. या संघाला शोधण्यात अखेर ९ दिवसांनी यश आलं असून सगळे सुदैवानं सुखरूप आहेत. त्यांच्यापुढील संकट मात्र अजूनही संपलं नाही, कारण गुहेतून बाहेर काढण्यासाठी कदाचित एक आठवडा किंवा महिनाभराचा अवधी आणखी लागण्याची शक्यता आहे. काही दिवस या मुलांना गुहेतच राहावं लागणार आहे. 
 
थायलंडमधली ही गुहा चौथ्या क्रमांकाची मोठी गुहा आहे. गुहेत सध्या पाणी शिरल्यानं बचावकार्यात अडथळे येत आहेत. काही दिवसांत या परिसरात अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. पावसामुळे गुहेतील पाण्याची पातळी वाढत जाणार आहे. त्यामुळे मुलांना गुहेबाहेर काढण्यात अडचणी येणार आहे. ब्रिटीश पाणबुड्यांच्या तेरा जणांच्या टीमनं रात्री १० वाजता या मुलांना शोधल आहे. हा संघ गुहेत खूपच आत अडकला आहे. पाण्यामुळे गुहेत चिखलही मोठ्या प्रमाणात झाला असे दिसून येतेय. संघाला खाण्याची रसद पोहोचवण्यात आली आहे. त्याचप्रमाणे काही औषधं देखील त्यांना देण्यात आली आहे. चार महिने पुरेल इतकी रसद त्यांना पुरवण्यात आली आहे.