1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक 2019
  3. लोकसभा निवडणूक 2019 बातम्या
Written By
Last Modified: शनिवार, 13 एप्रिल 2019 (09:26 IST)

स्मृती इराणी पदवीधर नाहीत

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी अमेठी मतदारसंघातून निवडणूक लढवत असून त्यांनी निवडणूक आयोगाकडे प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. यामध्ये दिल्ली विद्यापीठातून आपण पदवी पूर्ण केली नसल्याचे स्पष्ट केले आहे. उमेदवारी अर्ज दाखल करताना इराणी यांनी १९९१ मध्ये दहावी व १९९३ मध्ये बारावीची परीक्षा उत्तीर्ण केल्याचे नमूद केले आहे. दिल्ली विद्यापीठाच्या ओपन लर्निंगच्या माध्यमातून तीन वर्षांचा पदवी अभ्यासक्रम पूर्ण केला नसल्याचे इराणी यांनी म्हटले आहे. अमेठी मतदारसंघात इराणी राहूल गांधी यांच्याविरोधात निवडणूक लढवत आहेत.
 
विशेष म्हणजे गेल्या निवडणुकीमध्ये इराणी यांनी प्रतिज्ञापत्रामध्ये पदवीधारक असल्याचे म्हटल्याचा दावा विरोधकांनी केला होता आणि त्यावरून गदारोळ उडाला होता. इराणी पदवीधारक नसून त्यांनी ही माहिती खोटी दिल्याचा आरोप विरोधकांनी केला होता.