शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. अक्षय तृतीया
Written By

यंदा अक्षयतृतीयेला सोन्याचा सर्वाधिक भाव

अक्षयतृतीयेच्या पार्श्‍वभूमीवर सोने दरात वाढ झाली आहे.अहमदाबादमध्ये सोन्याचा भाव तोळ्याला 32,300 रुपयांवर गेला. गेल्या काही वर्षांतील अक्षयतृतीयेचा सोन्याचा हा सर्वाधिक भाव आहे. तर चांदीचा भावही 40 हजार रुपये किलोवर गेला आहे.
 
अक्षयतृतीया हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे. यंदा या आठवड्यात बुधवारी अक्षयतृतीया आहे. बहुतेक जण अक्षयतृतीयेचा मुहूर्त साधत सोने खरेदी करतात; पण सोन्याच्या भावाने 32 हजारांचा विक्रमी टप्पा ओलांडला आहे. सीरियावर अमेरिकेने केलेल्या हवाई हल्ल्यानंतर पश्‍चिम आशियात तणाव निर्माण झाला आहे. त्याचा परिणाम सोन्या-चांदीवर दिसून आला आहे.
 
गेल्या काही वर्षांत अक्षयतृतीयेला सोन्याचा भाव 30 हजार रुपये प्रतितोळा (10 ग्रॅम) च्या वर कधी गेला नाही. गेल्या वर्षी 9 मे रोजी अक्षयतृतीयेला सोन्याचा भाव 29,860 रुपये होता. 2018 च्या सुरुवातीला सोन्याचा भाव प्रतितोळा (10 ग्रॅम) 28,500 रुपये होता; पण यंदा येत्या काही दिवसांत सोन्याचा भाव आणखी वाढण्याची शक्यता आहे, असा अंदाज बाजारातील तज्ज्ञांनी व्यक्‍त केला आहे.