शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: बुधवार, 10 जून 2020 (10:37 IST)

वाहनधारकांना दिलासा, कागदपत्रांचे नूतनीकरणासाठी 30 सप्टेंबर 2020 पर्यंत मुदतवाढ

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी वाहनधारकांना मोठा ‍दिलासा दिला आहे. मोटार वाहनांच्या मुदत संपलेल्या कागदपत्रांना 30 सप्टेंबर 2020 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याची घोषणा केली गेली आहे. 
 
देशव्यापी लॉकडाउनमुळे मुदत संपलेल्या कागदपत्रांचे नूतनीकरण करण्यात अडचणी येत असल्याने यापूर्वी 30 जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती, तीच मुदतवाढ आता 30 सप्टेंबर 2020 पर्यंत वाढवण्यात आली आहे.
 
फिटनेस, परमिट (सर्व प्रकारचे), PUC, ड्रायव्हिंग लायसन्स, नोंदणी किंवा विमा इतर कोणतीही संबंधित कागदपत्रे ज्यांची वैधता संपलेली आहे त्यांचं नूतनीकरण करण्यासाठी मुदत वाढ देण्यात आली आहे. ज्यांच्या कागदपत्रांची मुदत 1 फेब्रुवारी ते 30 जूनच्या कालावधीत संपत आहे, त्यांच्यासाठी ही मुदतवाढ देण्यात आली आहे.