शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: बुधवार, 15 जून 2022 (18:50 IST)

CNG Home Delivery: CNG भरण्यासाठी पेट्रोल पंपावर जाण्याचा त्रास संपला, ही कंपनी सुरू करणार होम डिलिव्हरी सुविधा

CNG Home Delivery: आता सीएनजी भरण्यासाठी पेट्रोल पंपावर जाण्याचा त्रास संपणार आहे. तुम्ही फक्त एका फोन कॉलवर CNG ची होम डिलिव्हरी मिळवू शकाल. ही सुविधा आता मुंबईत सुरू होणार .

ऊर्जा वितरण स्टार्टअप कंपनी  Fuel Deliveryने महानगर गॅस लिमिटेडसोबत मुंबईत सीएनजीच्या घरपोच वितरणासाठी करार केला आहे. याअंतर्गत मोबाईल सीएनजी स्टेशन्स उभारण्यात येणार असून, ते 24 तास होम डिलिव्हरीची सुविधा देतील. 
 
सीएनजीवर चालणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांसाठी ही सुविधा उपलब्ध असेल. ही सुविधा सुरू झाल्यानंतर आता लोकांना सीएनजी भरण्यासाठी पंपावर तासनतास थांबावे लागणार नाही, असे कंपनीकडून सांगण्यात आले.
 
कंपनीच्या म्हणण्यानुसार, मुंबईत दोन मोबाईल सीएनजी स्टेशन चालवण्यास एमजीएलकडून मान्यता मिळाली आहे .येत्या तीन महिन्यांत मुंबईतील सायन आणि महापे येथून ही सेवा सुरू होणार आहे. या दोन ठिकाणच्या बाल स्थानकाचा विस्तार करण्यात येणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे. कंपनीच्या निवेदनानुसार, एकट्या मुंबईत सुमारे पाच लाख सीएनजी वाहने असून दरवर्षी 43 लाख किलो सीएनजीचा वापर केला जातो. या वाहनांसाठी मुंबईत केवळ 223 सीएनजी स्टेशन असताना, मोबाईल सीएनजी स्टेशन्स मोठा दिलासा देणारे ठरणार आहेत.