शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: बुधवार, 18 सप्टेंबर 2019 (09:41 IST)

सुमो पुन्हा भारताच्या रस्त्यावर दिसणार नाही

बातमीचे शिर्षक वाचून गोंधळ झाला असेल, मात्र हे खरे आहे ज्या सुमो जीप कार ने टाटा ला वाहन क्षेत्रात उभे केले ती आता पुन्हा भारतीय रस्त्यावर दिसणार नाही टाटा ने 1994 मध्ये टाटा सुमो ही एक आरामदायी आणि दमदार लूकची गाडी भारतात दाखल केली होती. सोबतच कार उत्पादनांत आपल्या करिअरला सुरुवात केली होती. मात्र आता 25 वर्षानंतर कंपनीने सुमो  गाडीचे निर्माण बंद केले आहे. सध्या तरी कंपनीनी याबाबत कोणतेही अधिकृत माहिती दिलेली नाही. मात्र कंपनीने आपल्या अधिकृत वेबसाईटवरुन ही गाडी काढून टाकली आहे. यासोबतच अशा अनेक गोष्टी आहे ज्यामुळे ही गाडी बंद झाल्याचे स्पष्ट होत आहे. या गाडीची किंमत 7 लाख 39 हजार ते 8 लाख 77 हजार रुपयांदरम्यान होती.टाटा सूमो  ही गाडी जुन्या पद्धतीच्या बांधणीवर आधारित आहे. त्यामुळे नवीन सुरक्षा नियमानुसार यात मोठ्या प्रमाणात बदल करावे लागायचे. तर दुसरीकडे गेल्या कित्येक वर्षांपासून या गाडीच्या विक्रीतही घट झाली होती. त्यामुळे नवीन नियम व बाजारातील मागणी कमी यामुळे टाटा ने ही गाडी हटवली आहे.