दूरसंचार कंपन्यांना दणका; प्रीमियम योजनांना 'ट्राय'ने लावला लगाम!
नेट न्यूट्रॅलिटी संपविण्याच्या आणि इंटरनेटच्या बाबतीत भेदभाव करणाऱ्या खासगी दूरसंचार कंपन्यांच्या प्रयत्नांना (Premium plan closed) दूरसंचार नियामक प्राधिकरण अर्थात 'ट्राय' ने लगाम लावला आहे. भारती एअरटेल तसेच वोडाफोन -आयडिया या कंपन्यांनी विशेष ग्राहकांना जास्त स्पीडची इंटरनेट सेवा देण्याची प्रीमियम योजना बंद करावी, असा आदेश ट्रायने दिला आहे.
अन्य ग्राहकांच्या सेवांचा दर्जा कमी करून विशेष (Premium plan closed) ग्राहकांना चांगली सेवा देण्याचे आमिष खासगी दूरसंचार कंपन्या दाखवीत आहेत काय, असा सवाल मागील काही काळापासून उपस्थित केला जात आहे. या पार्श्वभूमीवर अंतरिम आदेश देत ट्रायने प्रीमियम योजना परत घेण्याचे निर्देश दूरसंचार कंपन्यांना दिले आहेत. ट्रायने विशेष योजनांची माहितीही भारती एअरटेल व वोडाफोन आयडिया यांच्याकडून मागविली आहे.