मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: गुरूवार, 5 मार्च 2020 (13:15 IST)

Women’s T20 World Cup : सामना न खेळून टीम इंडिया अंतिम फेरीत

भारतीय संघाने महिला टी २० विश्वचषकाच्या इतिहासात प्रथमच अंतिम फेरी गाठण्याचा विक्रम रचला. वुमन्स टी २० विश्वचषक स्पर्धेत गुणांच्या तुलनेनुसार भारतीय संघाला अंतिम फेरीत स्थान मिळाले. आज भारत आणि इंग्लंड यांच्यात होणारा उपांत्य फेरीचा सामना पावसाच्या व्यत्ययामुळे रद्द करण्यात आला. भारतीय महिला संघाने सामना न खेळूनही एक इतिहास रचला.
 
सीरीजमध्ये भारताने 4 सामने जिंकत 8 गुण मिळवले होते. तर इंग्लंडने 3 सामने जिंकून 6 गुण मिळवले होते. त्यामुळे स्पर्धेच्या नियमांच्या आधारावर भारतीय संघाला अंतिम फेरीत स्थान देण्यात आले. भारताने सीरीजमध्ये आपले सर्व सामने जिंकून उपांत्य फेरी गाठली होती. उपांत्य फेरीचे तिकीट पटकावणारा भारत स्पर्धेतील पहिला संघ ठरला होता.
 
यापूर्वी 2018 च्या टी 20 विश्वचषक स्पर्धेमध्ये भारतीय संघ उपांत्य फेरीपर्यंत पोहोचला होता. त्यावेळी भारताला उपांत्य फेरीत इंग्लंडनेच पराभूत केले होते.