बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: मंगळवार, 1 सप्टेंबर 2020 (11:04 IST)

आता बोला, झारखंड क्रिकेट असोसिएशनच्या थकबाकीदारांच्या यादीत धोनीचं नाव

झारखंड क्रिकेट असोसिएशनच्या थकबाकीदारांच्या यादीत धोनीचं नाव आलं आहे. ज्या स्टेडियममध्ये धोनीच्या नावाने पॅव्हेलियन आहे, त्याच क्रिकेट असोसिएशनमध्ये धोनीची थकबाकी आहे. झारखंड क्रिकेट असोसिएशनमध्ये धोनी आजीवन सदस्य आहे.
 
झारखंड क्रिकेट असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा वेबीनारच्या माध्यमातून झाली. या सभेत २०१९-२० या वार्षिक रिपोर्ट देण्यात आला. या रिपोर्टमध्ये धोनीचं नाव ५९व्या क्रमांकावर आहे. धोनीच्या नावावर ३१ मार्च २०२० पर्यंतची थकबाकीची रक्कम दाखवण्यात आली आहे.
 
काहीतरी त्रुटी आल्यामुळे धोनीचं नाव या यादीमध्ये आलं असेल, अशी प्रतिक्रिया धोनीचे पहिले प्रशिक्षक केशव बॅनर्जी यांनी दिली. धोनीचं नाव खराब करण्यासाठी तर अशा गोष्टी केल्या जात नाहीयेत ना? असा सवालही बॅनर्जी यांनी उपस्थित केला आहे.