बाळासाहेब ठाकरे जयंती: पहिले व्यंगचित्र साप्ताहिक 'मार्मिक’

Bal Thackeray
Last Modified शुक्रवार, 22 जानेवारी 2021 (17:05 IST)
बाळ केशव ठाकरे ऊर्फ बाळासाहेब ठाकरे हे महाराष्ट्रातील शिवसेना पक्षाचे संस्थापक, राजकारणी व व्यंगचित्रकार होते. सामना या मराठी दैनिकाचे हे संस्थापक, तसेच प्रमुख संपादकही होते.
ठाकरेंनी सर्वप्रथम एक व्यंगचित्रकार म्हणून सामाजिक प्रश्नांवर भाष्य करण्यास सुरुवात केली. १९५० मध्ये ते 'फ्री प्रेस जर्नल’ मध्ये व्यंगचित्रकार म्हणून रुजू झाले. फ्री प्रेस जर्नलमध्ये काम करीत असतानाच ठाकरे विविध संस्थांसाठी, कंपन्यांसाठी व नियतकालिकांसाठी चित्रे, व्यंगचित्रे, जाहिरातीचे डिझाइन या क्षेत्रांतही काम करीत असत. त्यांच्या व्यंगचित्रात इंदिरा गांधींची व्यक्तिरेखा आवडती होती. त्यांनी ज्येष्ठ व्यंगचित्रकार आर.के. लक्ष्मण यांच्यासमवेतही काही काळ काम केले.
नंतर बाळासाहेबांनी नोकरी सोडून स्वतःचे व्यंगचित्रात्मक साप्ताहिक काढण्याचा निर्णय घेतला. त्यांनी ऑगस्ट १९६० मध्ये ‘मार्मिक’ हे साप्ताहिक सुरू केले. साप्ताहिकासाठीचे हे ‘मार्मिक’ नाव बाळासाहेबांना वडील प्रबोधनकारांनी सुचविले होते. मराठीतील हे पहिले व्यंगचित्र साप्ताहिक ठरले. ‘मार्मिक’ च्या पहिल्या अंकाचे प्रकाशन तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते झाले. या समारंभास प्रा. अनंत काणेकरही उपस्थित होते.

संयुक्त महाराष्ट्र स्थापन झालेला होता, पण प्रामुख्याने मुंबईत मराठी माणसावर अन्याय होतच होता. या प्रश्नाला मार्मिकने वाचा फोडली. महाराष्ट्रात येऊन मराठी माणसाबद्दल अनादर बाळगणाऱ्यांना ठाकरेंनी व्यंगचित्रांच्या माध्यमातून टीका केली. १९६० पासून ते राष्ट्रीय व महाराष्ट्र राज्य स्तरावरील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीत, तसेच इतिहासाच्या प्रत्येक टप्प्यावर मराठी जनांना मार्गदर्शन करत ‘मार्मिक’ अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत आहे. ठाकरे लहान मुलांसाठीच्या "श्‍याम‘ या पाक्षिकाचे सुद्धा संपादक होते.


यावर अधिक वाचा :

मालदीवशी जुळेल हैदराबाद, 11 फेब्रुवारीपासून GoAir थेट ...

मालदीवशी जुळेल हैदराबाद, 11 फेब्रुवारीपासून GoAir थेट विमानसेवा सुरू करणार आहे
हैदराबादहून आता मालदीवला जाणे सोपे होईल. खरं तर, परवडणारी सेवा देणारी विमान कंपनीची गोएअर ...

केवळ एक शब्द आणि महिलेला दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

केवळ एक शब्द आणि महिलेला दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा
प्रत्येक देशात वेगवेगळे कायदे असतात अशात संयुक्त अरब अमिरातील देखील काही कायदे अत्यंत कडक ...

नियम मोडणाऱ्या मुंबईकरानांकडून १३९ दिवसांत १७ लाख रुपयांची ...

नियम मोडणाऱ्या मुंबईकरानांकडून १३९ दिवसांत १७ लाख रुपयांची दंड वसुली
मुंबईत कोरोना विषाणुचे संकट कमी होत असले तरी मुंबईकर मात्र कोरोना गांभीर्याने घेत ...

कोरोनामुळे पहिल्यांदा काळाघोडा महोत्सव ऑनलाईन साजरा होणार

कोरोनामुळे पहिल्यांदा काळाघोडा महोत्सव ऑनलाईन साजरा होणार
आशिया खंडातील सर्वात मोठा आणि सर्वात प्रतिष्ठित कला महोत्सव म्हणून ओळखला जाणारा काळाघोडा ...

चला फिरायला जाऊया, राज्यात विविध २० पर्यटन महोत्सवांचे

चला फिरायला जाऊया, राज्यात विविध २० पर्यटन महोत्सवांचे आयोजन
पर्यटन संचालनालयामार्फत राज्यातील कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर या सहा ...

पूजा चव्हाण प्रकरणी पुण्यातील वकिलांच्या जस्टीस लीग ...

पूजा चव्हाण प्रकरणी पुण्यातील वकिलांच्या जस्टीस लीग सोसायटीमार्फत लष्कर न्यायालयात याचिका दाखल
७ फेब्रुवारी रोजी पूजा चव्हाण हिने आत्महत्या केल्यानंतर या प्रकरणात आत्तापर्यंत अनेक ...

शाळांच्या फी प्रश्नावर मुंबई हायकोर्टात अंतिम निर्णय ...

शाळांच्या फी प्रश्नावर मुंबई हायकोर्टात अंतिम निर्णय सोमवारी दुपारी
मागील काही दिवसांपासून शाळांच्या फीवरून पालक आणि शाळा यांच्यात वाद सुरु असल्याचे पाहायला ...

बुलडाण्यात सोमवारपर्यत संचारबंदी

बुलडाण्यात सोमवारपर्यत संचारबंदी
बुलडाण्यात कोरोनाबाधितांची संख्या दरदिवशी वाढतांना दिसत आहे

आमची होणारी बदनामी बंद करा अन्यथा आम्हाला आत्महत्या करावी ...

आमची होणारी बदनामी बंद करा अन्यथा आम्हाला आत्महत्या करावी लागेल
पूजा चव्हाणच्या आत्महत्येनंतर कुटुंबियांनी पहिल्यांदाच माध्यमांसमोर येऊन त्याची ...

SMA Type 1 या दुर्मिळ आजाराशी लढणाऱ्या चिमुकलीला दिलं16 ...

SMA Type 1 या दुर्मिळ आजाराशी लढणाऱ्या चिमुकलीला दिलं16 कोटींचं इंजेक्शन !
मुंबई : SMA Type 1 या दुर्मिळ आजार झाल्याने मुंबईच्या हिंदुजा रुग्णालयात मृत्यूशी झुंज ...