भारताला पिनकोड सिस्टिम दिलीय या मराठी माणसाने..

Shriram Bhikaji Velankar
Last Modified गुरूवार, 22 जुलै 2021 (09:16 IST)
आता तुम्ही सगळ्यांनी पिन कोड तर पाह्यलाच असेल. पाह्यला असेल काय, कित्येकदा लिहिला पण असेलच की हो. पण कधी विचार केलाय, ही भानगड कशी आणि का अस्तित्वात आली याचा? किंवा याच्या मागं नक्की कुणाचं सुपीक डोकं असेल याचा? ही आयडियाची कल्पना आहे
श्रीराम वेलणकर या मराठमोळ्या माणसाची. यांनीच पूर्ण भारताला पिनकोडची देणगी दिलीय बरं...

म्हणजे पोस्टल इंडेक्स नंबर्. हे घडलं १९७२मध्ये. तोपर्यंत जनरल पोस्ट ऑफिसांत पत्रांवरचे पत्ते वाचून त्यांचि विभागवार विभागणि व्हायची. पण त्यात बऱ्याच अडचणी यायच्या. म्हणजे एकसारख्या नावाची माणसं, एकसारख्या नावाचि गावं, कधी कुणाचं अक्षर नीट वाचता येण्यासारखं नसे, आणि हे सगळं कमी की काय म्हणून आपल्या देशभरात पत्ता लिहिण्यासाठी वापरलेल्या कितीतरी भाषा!!
चुकीचे पत्ते लिहिणं हा तर काही लोकांचा जन्मसिद्ध अधिकार आहेच. हे सगळं टाळण्यासाठी विभागवार पत्रांची विभागणी करण्यासाठी ही पिनकोड पद्धत अंमलात आणण्यात आली.

पोस्ट आणि टेलीग्राफ खात्यात नोकरीत असताना श्रीराम भिकाजी वेलणकर यांनी त्यावर उपाय म्हणून १५ ऑगस्ट १९७२ रोजी पिन कोड पद्धत अंमलात आणली. त्यामुळेच श्रीराम भिकाजी वेलणकर यांना ‘पिन कोड’ प्रणालीचे नक म्हणतात. या पिनकोडमुळे बरीच कामं सोपी झाली हे खरं.

पिनकोडची रचना अशी आहे.
पूर्ण देश ९ झोन मध्ये विभागला गेला आहे. यातले ८ झोन हे भौगोलिक विभाग आहेत, तर एक मिलिट्रीसाठी वापरला जातो.

आता पाहूयात हा पिनकोड वाचायचा कसा..

यातले पहिले दोन अंक पोस्टऑफिस दर्शवतात. म्हणजे यातही हा तक्ता वापरता येईल
११ - दिल्ली

१२ व १३ - हरयाणा

१४
ते १६ - पंजाब

१७ - हिमाचल प्रदेश

१८ ते १९ जम्मू आणि काश्मिर
२० ते २८ - उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड

३० ते ३४ - राजस्थान

३६ ते ३९ - गुजरात

४० ते ४४ - महाराष्ट्र

४५ ते ४९ मध्य प्रदेश आणि छत्तीसगड

५० ते ५३ - आंध्र प्रदेश

५६ ते ५९ - कर्नाटक

६० ते ६४ - तामिळनाडू

६७ ते ६९ - केरळ

७० ते ७४ - पश्चिम बंगाल

५५ ते ७७ - ओरिसा

७८ - आसाम

७९ - पूर्वांचल

८० ते ८५ बिहार आणि झारखंड

९० ते ९९ - आर्मी पोस्टल सर्व्हिस

म्हणजे सहा आकडी पिनकोडमधला पहिला अंक दाखवतो- विभाग, दुसरा अंक- उपविभाग, तिसरा अंक - सॉर्टींग जिल्हा आणि राहिलेले शेवटचे तीन अंक हा त्या विशिष्ट पोस्ट ऑफिसचा नंबर असतो. उदाहरणार्थ ४१३००१ हा सोलापूरचा पिनकोड आहे. यात पहिला अंक दाखवतो- पश्चिम विभाग, त्यानंतर १३ हा पश्चिम विभागातल्या महाराष्ट्रातला एक उपविभाग दाखवतो, ४१३ हा अंक सॉर्टिंग जिल्हा दर्शवतो, तर शेवटचे तीन अंक - ००१ हा सोलापूर जिल्ह्यातल्या विशिष्ट पोस्ट ऑफिसचा नंबर आहे.
आता पत्रं लिहिणं दुर्मिळ होत चाललं असलं तरी पिनकोड सिस्टिम कधीच इतिहासजमा होणार नाही. ही अशी पद्धत शोधणाऱ्या श्रीराम भिकाजी वेलणकरांना मानाचा मुजरा...!

श्रीराम भिकाजी वेलणकर हे संस्कृत पंडित होते व पाली भाषेचे गाढे अभ्यासकही होते. आज दुर्देवाने या श्रीराम भिकाजी वेलणकर यांच्या बद्दल खूप कमी माहिती उपलब्ध आहे.यावर अधिक वाचा :

बॉयफ्रेंडसाठी मुजफ्फरपूरमध्ये 'दंगल', मुलींनी एकमेकांचे केस ...

बॉयफ्रेंडसाठी मुजफ्फरपूरमध्ये 'दंगल', मुलींनी एकमेकांचे केस ओढले
मुजफ्फरपूर: मुलींच्या अफेअरमध्ये तुम्ही मुलांमध्ये अनेकदा मारहाण करताना पाहिले असेल. आता ...

भारतीय सैन्याच्या अपघात: 2 मृत्यू

भारतीय सैन्याच्या अपघात: 2 मृत्यू
जम्मू-काश्मीरच्या पाटणी टॉप भागात एक मोठा अपघात झाला आहे.नागाच्या मंदिराजवळ शिवगडच्या ...

सोनू सूद : इन्कम टॅक्सचे छापे, राज्यसभेची ऑफर आणि बदललेली ...

सोनू सूद : इन्कम टॅक्सचे छापे, राज्यसभेची ऑफर आणि बदललेली शिवसेना
बॉलीवूड अभिनेता सोनू सूदवर इनकम टॅक्स विभागाने 20 कोटींपेक्षा जास्त रूपयांची करचुकवेगिरी ...

कोविशील्ड लस मंजूर, ज्या लोकांनी दोन्ही डोस घेतले आहेत ते ...

कोविशील्ड लस मंजूर, ज्या लोकांनी दोन्ही डोस घेतले आहेत ते USला जाऊ शकतील
कोरोनाव्हायरस विरुद्ध पूर्णपणे लसीकरण झालेल्या सर्व हवाई प्रवाशांसाठी अमेरिका ...

सोयाबीनच्या किमतीत मोठी घसरण, शेतकरी चिंतेत

सोयाबीनच्या किमतीत मोठी घसरण, शेतकरी चिंतेत
महाराष्ट्रातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची समस्या कमी होण्याचे नाव घेत नाही आहे. काही ...

व.पु. काळे प्रकाशित साहित्य

व.पु. काळे प्रकाशित साहित्य
वसंत पुरुषोत्तम काळे हे व.पु. काळे नावाने प्रसिद्ध, हे मराठी भाषेतील लेखक, कादंबरीकार, ...

Momos तयार करण्याची सोपी रेसिपी

Momos तयार करण्याची सोपी रेसिपी
मोमोज बनवण्यासाठी आधी कणिक मळून घ्या आणि अर्धा तास बाजूला ठेवा. यानंतर एक पॅन घ्या आणि ...

ग्लोइंग त्वचा मिळविण्यासाठी Pumpkin Face Pack लावून बघा

ग्लोइंग त्वचा मिळविण्यासाठी Pumpkin Face Pack लावून बघा
आपल्या सर्वांना माहित आहे की भोपळा आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. पण, खूप कमी लोकांना ...

World Pharmacist Day 2021 : NIRF रँकिंगनुसार भारतातील शीर्ष ...

World Pharmacist Day 2021 : NIRF रँकिंगनुसार भारतातील शीर्ष फार्मसी महाविद्यालये
फार्मासिस्टची महत्वाची भूमिका ओळखण्यासाठी आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी 25 सप्टेंबर रोजी ...

DENV-2 डेंग्यूच्या नव्या व्हेंरिएंटचा धोका, लक्षणं जाणून ...

DENV-2 डेंग्यूच्या नव्या व्हेंरिएंटचा धोका, लक्षणं जाणून घ्या
डेंग्यूच्या नव्या व्हेंरिएंटचा DENV-2 बद्दल डॉक्टरांनी धोक्याचा इशारा जारी केला आहे. ...