शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By
Last Modified: मंगळवार, 16 ऑक्टोबर 2018 (13:54 IST)

१६ ऑक्टोबर वर्ल्ड स्पाइन डे - निरोगी पाठीसाठी आठ सोपे मार्ग

अनारोग्यदायी जीवनशैली, दगदगीची दिनचर्या आणि चुकीची शारीरिक ढब यामुळे पाठीच्या कण्याशी संबंधित गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. कामाचे वाढलेले तास आणि वेळेत काम पूर्ण करण्याचाताण, असे आजच्या बहुतेक वर्किंग प्रोफेशनल्सच्या दिवसाचे वर्णन करता येईल. जेव्हा तुमच्या शरीराचे स्नायू आणि सांधे संतुलित असतात आणि त्यांना व्यवस्थित आधार मिळतो तेव्हा तुम्ही दैनंदिन कामेसुरळीतपणे पार पाडू शकता
 
क्यू. आय. स्पाइन क्लिनिकच्या वरिष्ठ स्पाइन तज्ज्ञ, डॉ. गरिमा आनंदानी यांच्या मते, तुमच्या पोटातील व श्रोणीभागातील स्नायू (कोअर मसल्स) बळकट असले तर तुमची पाठ सुदृढ राहते आणि पाठदुखीकिंवा इजा होण्याला प्रतिबंध करते. किंबहुना, पाठीच्या कण्याचे पुनर्वसन व कोअर स्नायूंच्या नियमित व्यायामामुळे पाठीच्या खालच्या भागातील वेदना शमते तसेच त्याला प्रतिबंधही करता येतो.
 
निरोगी पाठीसाठी, दैनंदिन जीवनात -कामाच्या ठीकाणी तुमची शारीरिक ढब सुधारण्याचे हे काही सोपे मार्ग
1. उभे राहाः दर तासाला उभे रहा, जेणेकरून शारीरिक स्थितीत बदल होईल, स्नायू ताणले जाऊ नयेत यासाठी ते स्ट्रेच करा, स्नायूंना पीळ द्या, ते वळवा.
2. योग्या प्रकारे वाकाः वाकताना नेहमी आधी गुडघे वाकवा, थेट पाठ वाकवू नका. तुम्ही थेट पाठीने वाकलात किंवा पोक काढले तर तुमच्या पाठीच्या स्नायूंवर आणि मणक्यांवर ताण येईल.
3. पोक काढून बसू नकाः तुम्ही ताठ बसा आणि तुमच्या खुर्चीच्या पाठीला पाठ लावून बसा. तुमची खुर्ची डेस्कच्या जवळ असावी. आणि तुम्हाला पाठीला आधार देण्यासाठी कदाचित लंबर रोलचीआवश्यकता भासू शकते.
4. योग्य प्रकारे खुर्चीत बसणेः बसताना तुमचे कुल्हे एकदम मागच्या बाजूला असावेत आणि पाय सपाट असावेत आणि जमिनीला पूर्ण टेकलेले असावेत. तुमच्या हातांना आर्मरेस्टचा आधार असावा आणि पाठबॅकरेस्टला टेकलेली असावी.
5. उपकरणे नजरेच्या पातळीवर ठेवाः तुमच्या लॅपटॉप किंवा डेस्कटॉपचा सर्वात वरचा भाग तुमच्या नजरेच्या ९० अंशांच्या कोनात असावा आणि माऊस कोपराच्या ९० अंशांच्या कोनात असावा. लॅपटॉपची उंचीवाढविण्यासाठी लॅपटॉप स्टँड वापरता येऊ शकतो. मोबाईल फोन वापरताना मान खाली वाकविण्याऐवजी नजर खाली करून मोबाईल पाहा. असे केल्यास फोन अधिक काळासाठी वापरताना मानेच्या स्नायूंवरताण कमी येतो.
6. वजन उचलताना काळजी घ्याः पूर्णपणे खाली न बसता, बैठका मारताना खाली वाकता तेवढे वाका, वस्तू तुमच्या शरीराच्या जवळ उचलून घ्या आणि मग ती पूर्ण उचला. पोक काढून उचलू नका कारण त्यामुळेपाठीच्या मणक्यांवर ताण येतो.
7. स्ट्रेचिंग अत्यंत महत्त्वाचे आहेः सोप्या प्रकारे स्ट्रेचिंग करा. तुमचे हात तुमच्या पाठीच्या खालच्या भागावर ठेवा आणि मागील बाजूस वाका. 
(खबरदारीः वेदना होत असेल तर वैद्यकीय निरीक्षणाशिवाय घरच्या घरी व्यायाम किंवा स्ट्रेचिंग करू नका. स्पाइन स्पेशिअॅलिस्ट किंवा स्पाइन रिहॅबिलिटेशन एक्स्पर्टचा सल्ला घ्या.)
8. चालत राहाः कुणालाही फोन करताना उभे राहून फोन करा किंवा मीटिंग चालत चालत करा, तुमच्या सहकाऱ्यांना फोन किंवा टेक्स्ट न पाठवता त्यांच्या डेस्कपाशी जाऊन बोला.
 
सहा आठवड्यांहून अधिक काळासाठी पाठदुखीचा त्रास होणे, ही वेदना तुमच्या हातापायांमध्ये होत होणे. पाच मिनिटांहून अधिक काळ चालणे वा उभे राहणे शक्य नसणे. आतड्यांवरील नियंत्रणगमावणे. पाठीच्या कण्यावर शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला जाणे. वरील लक्षणे आढळ्यास स्पाइन तज्ज्ञाची भेट घ्या.