जाणून घ्या डाव्या कुशीवर झोपण्याचे 7 फायदे
चांगल्या आरोग्यासाठी झोपणे जितके आवश्यक आहे तितकीच महत्त्वाची आहे झोपण्याची शैली. होय, आपल्याला झोपण्याची दशा आणि दिशा ठरवते आपले आरोग्य. तसे तर लोकं स्वत:ला आरामदायक वाटणार्या स्थितीत झोपणे पसंत करतात पण डाव्या कुशीवर झोपण्याचे काही विशेष फायदे आहेत. पाहू या काय आहे ते फायदे:
1 डाव्या कुशीवर झोपणे आपल्या आरोग्यासाठी फायद्याचे आहे. याने आपल्या हृदयावर दबाव जाणवत नसल्याने हृदय योग्य पद्धतीने काम करतं. यामुळे हृदयाचे आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते.
2 याने शरीरातील विभिन्न अंग आणि मेंदूपर्यंत रक्तात ऑक्सिजनचा प्रवाह सुरळीत होतो. याने शरीराचे सर्व अंग निरोगी राहतात आणि चांगल्या प्रकारे कार्य करतात.
3 गर्भवती स्त्रियांसाठी डाव्या कुशीवर झोपणे योग्य आहे कारण याने गर्भात वाढत असलेल्या बाळाच्या प्रकृतीवर विपरित परिणाम होत नाही. याव्यतिरिक्त टाचा, हाता आणि पायांमध्ये सूज येण्याची समस्या दूर होते.
4 डाव्या बाजूला झोपण्याने रक्त प्रवाह सुरळीत होत असल्याने झोप पूर्ण होते. या स्थितीत झोपून उठल्यावर थकवा जाणवत नाही आणि पोटासंबंधी समस्याही दूर होतात.
5 या प्रकारे झोपल्याने पचन क्रिया सुरळीत होते आणि पाचक प्रणालीवर अतिरिक्त दबाव येत नाही. डाव्या बाजूकडे झोपल्याने शरीरात जमा होत असलेले टॉक्सिन लसिका वाहिनी तंत्राद्वारे बाहेर पडतात.
6 बद्धकोष्ठतेची तक्रार असलेल्यांनी डाव्या कुशीवर झोपायला हवे. आराम मिळेल. गुरुत्वाकर्षणामुळे अन्न लहान आतड्यातून मोठ्या आतड्यात पद्धतशीर ढकलले जाते आणि सकाळी सहजपणे पोट स्वच्छ होतं.
7 या प्रकारे झोपल्याने पोटातील अॅसिड वर न जाता खाली येतं, ज्याने अॅसिडिटी आणि छातीत जळजळणे अश्या समस्या दूर होतात.