testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

स्तनाचा कर्करोग नसल्याची खात्री करून घ्या, घरीच तपासणी करा

breast cancer
Last Modified शनिवार, 11 जानेवारी 2020 (15:24 IST)
आपण स्तन कर्करोगाला बळी नसल्याची तपासणी घरी देखील करू शकता. कर्क रोग हा वेगाने पसरणारा आजार असल्यामुळे वेळोवेळी तपासणी करणे आवश्यक आहे. महिला सर्वात जास्त प्रमाणात स्तनाच्या कर्करोगाने ग्रसित असतात. अश्या परिस्थितीत स्तनांची नियमित तपासणी केल्याने सुरुवातीस कर्करोगाचा शोध लावता येऊ शकतो आणि त्याला प्राणघातक होण्यापासून बचाव करू शकतो.

डॉक्टरांकडे जाण्यापूर्वी आणि तपासणी करण्यापूर्वी आपण स्वतः आपल्या स्तनाची तपासणी करून प्रारंभिक लक्षणे ओळखू शकता. स्तन कसे तपासायचे हे जाणून घ्या, काही चरणां मध्ये.

1 आरशासमोर उभे राहा
आरशासमोर उभे राहून खोलीत भरपूर प्रकाशात येत असल्यास आपले खांदे सरळ ठेवा, हातांना सैल सोडा, आणि स्तनाच्या आकारात काही फरक आहे का बघा, किंवा कोणती ही विकृतीची तपासणी करा.

2 स्तनाग्रांची तपासणी
स्तनानंतर, स्तनाग्रांची तपासणी करा. त्यात कुठल्याही प्रकारचे डाग असल्यास किंवा त्यांच्या रंगात अंतर आहे का बघा. नंतर स्तनाग्रांना दाबून बघा. द्रवस्त्राव होत तर नाहीये याची तपासणी करा.

3 काखेची तपासणी
स्तनांच्या कर्करोगासाठी केवळ स्तनच नाही तर काखेचीही तपासणी आवश्यक आहे. यासाठी आपला हात वर करा आणि आपल्या काखांचे परीक्षण करा. काखेत बोट फिरवा आणि तेथे कुठली
गाठ तर नाही हे तपासा. दोन्ही काख पूर्णपणे तपासा.

4 स्तनांच्या ऊतकांची तपासणी
आपल्या स्तनाच्या ऊतकांना हळुवार दाबा आणि काखेच्या भागापासून स्तनापर्यंत प्रत्येक ऊतक नीट तपासून पहा की त्यात कोणत्याही प्रकाराची गाठ किंवा इतर काही समस्या तर नाहीत.

5 मासिक पाळीच्या 3-5 दिवसांनंतर तपासा
मासिक पाळीच्या 3 ते 5 दिवसांनंतर स्तन तपासणीसाठी सर्वोत्तम काळ असतो. ह्याचे कारण असे आहे की मासिक पाळीच्या 5 दिवसांनंतर स्तनांवर सूज नसते आणि त्यांचे परीक्षण करणे सोपे जाते.

दरमहा स्वत: साठी 10 मिनिटे घ्या आणि आपल्या स्तनाची तपासणी करा. आपण नियमितपणे स्तनाचे परीक्षण करणे सुरू करा आणि काहीही विचित्र आढळल्यास लगेचच डॉक्टरांचा सल्ला घेणे विसरू नका.


यावर अधिक वाचा :

डोळ्यांचा त्रास कमी होण्यासाठी Whats-app आणलं खास फीचर

डोळ्यांचा त्रास कमी होण्यासाठी Whats-app आणलं खास फीचर
Whatsapp ने बहुप्रतीक्षित डार्क मोड हे फीचर रोलआउट करण्यास सुरूवात केली आहे. ...

मराठी साहित्य संमेलन उस्मानाबादः फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या ...

मराठी साहित्य संमेलन उस्मानाबादः फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या अध्यक्षतेखाली आज उद्घाटन
93वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबाद येथे होत आहे.

Kashmir Internet Shutdown: सुप्रीम कोर्ट - जम्मू-काश्मीर ...

Kashmir Internet Shutdown: सुप्रीम कोर्ट - जम्मू-काश्मीर सरकारने संचारबंदी निर्णयाचा आढावा घ्यावा
काश्मीरमध्ये इंटरनेट बंद ठेवण्याची अजूनही गरज आहे का, याचा आढावा घेण्याचे आदेश सुप्रीम ...

JNU हिंसाचार: कुलगुरू जगदीश कुमार - JNUSU अध्यक्ष आयेशी ...

JNU हिंसाचार: कुलगुरू जगदीश कुमार - JNUSU अध्यक्ष आयेशी घोषला भेटणं माझी एकट्याचीच जबाबदारी नाही
'जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे (JNU) कुलगुरू एम. जगदीश कुमार हे उजव्या विचारसरणीकडे झुकलेले ...

सिद्धिविनायक मंदिर पाच दिवस राहणार बंद

सिद्धिविनायक मंदिर पाच दिवस राहणार बंद
मुंबई- 15 जानेवारी ते 19 जानेवारी या दरम्यान प्रभादेवी येथील सिद्धिविनायकाचे दर्शन बंद ...

मासिक पाळी वेळेवर येण्यासाठी घरघुती उपाय

मासिक पाळी वेळेवर येण्यासाठी घरघुती उपाय
मासिक पाळी नियमित असणे आरोग्यासाठी योग्य असतं. अनेक स्त्रियांची पाळी येण्याची वेळ निश्चित ...

शौचावाटे रक्त पडणे, ही समस्या हलक्यात घेऊ नका

शौचावाटे रक्त पडणे, ही समस्या हलक्यात घेऊ नका
कधी कधी शौच्या वाटून रक्त येते. जेव्हा पोट व्यवस्थित साफ होत नाही त्यामुळे शौचास त्रास ...

पपईने त्वचा उजळते, विश्वास बसत नसेल तर नक्की वाचा

पपईने त्वचा उजळते, विश्वास बसत नसेल तर नक्की वाचा
पपईचे तुकडे बारीक करून त्यात लिंबाचा रस घाला. ही पेस्ट चेहर्‍यावर लावावी.

कोक्लेयर इम्प्लांट्स बद्दलची हि महत्वपूर्ण माहिती ठाऊक ...

कोक्लेयर इम्प्लांट्स बद्दलची हि महत्वपूर्ण माहिती ठाऊक असायलाच हवी
जर आपल्यापैकी कोणाला कमी ऐकू येण्याचा किंवा ऐकू न येण्याचा त्रास असेल, तर इथे काही ...

कमी रक्तदाबाचा त्रास आहे? मग हे करून बघा......

कमी रक्तदाबाचा त्रास आहे? मग हे करून बघा......
अशक्तपणा जाणवल्यास किंवा चक्कर आल्यास हे लक्षणे लो ब्लड प्रेशरचे असू शकतात. अशक्तपणा, ...