शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: शुक्रवार, 14 मे 2021 (18:55 IST)

संत्रीच्या अति सेवनाने आरोग्यास हानी होऊ शकते

उन्हाळा येतातच संत्रीचा हंगाम येतो.संत्री आणि त्याचे रस हे रणरणत्या उन्हात सेवन केल्याने थंडावा मिळतो . संत्रीचे सेवन कोणत्याही स्वरूपात करणे सौंदर्य आणि आरोग्यासाठी फायदेशीरच आहे. परंतु जर संत्रीचे सेवन चुकीच्या वेळी केली किंवा अति जास्त प्रमाणात खालले तर हे नुकसानदायी होऊ शकते. संत्री शरीराला कशा प्रकारे नुकसान देतात जाणून घेऊ या. 
 
1 जास्त प्रमाणात संत्री चे सेवन केल्याने दातांसाठी हानिकारक असू शकतं. दातांवर इनेमलचा थर असतो जो दातांची सुरक्षा करतो. संत्रींमध्ये ऍसिड असतात जे दातांच्या इनेमल मधील कॅल्शियमसह प्रतिक्रिया देतात. जे दातांसाठी हानिकारक आहे. 
 
2 असे म्हटले जाते की संत्री मध्ये असलेले कार्बोहायड्रेट रक्तातील ग्लायसेमिक इंडेक्सचा भार वाढतो. संत्री मध्ये फायबर, कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त असते, हे भूक वाढवते .या मुळे वजन वाढण्याची समस्या देखील होऊ शकते. 
 
3 संत्री मध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स, फ्लेव्होनॉइड, अमिनो एसिड इत्यादी पोषक घटक आढळतात .जे आरोग्यासाठी आणि त्वचेसाठी फायदेशीर आहे.परंतु संत्री योग्यवेळी खाणे देखील आवश्यक आहे. संत्री कधीही सकाळी आणि रात्री खाऊ नये. प्रयत्न करा की संत्री दिवसा खाण्याचा प्रयत्न करा.